Home > मॅक्स व्हिडीओ > विषाच्या नशेसाठी नशेडी मोजतायत करोडो रुपये...

विषाच्या नशेसाठी नशेडी मोजतायत करोडो रुपये...

विषाच्या नशेसाठी नशेडी मोजतायत करोडो रुपये...
X

विष, मौत देणारी ही गोष्ट मज्जा देते तरी कशी ? चला तर मग पाहूयात. नशेसाठी विषाची टॅबलेट वापरली जाते. नागाचे विष काढून ते सुकवून त्याची पावडर बनवून त्या पावडरची टॅबलेट बनवतात. आणि हीच ती टॅबलेट जी रेव्ह पार्टीमध्ये दारू सोबत मिक्स करून पिण्यासाठी विकली जाते. एका टॅब्लेटची किंमत अंदाजे १८००० ते सुमारे २५००० एवढी असते. ह्या टॅबलेटला K72 , k76 असे सुद्धा बोलतात.

ही गोष्ट झाली विषाच्या गोळीची आता आपण पाहूयात की, नेमकं विषारी साप चावल्यावर नशा कशी येते ते...

विषारी सापांना आधी काही इंजेक्शन्स दिली जातात. त्यामुळे त्यांच्या विषाचा परिणाम कमी होतो आणि ते विष जीवघेणे राहत नाही. त्यांनतर त्यांना जीभेजवळ घेऊन चावायला दिल जातं. एका रेव्ह पार्टीमध्ये एका snake bite ची किंमत १५००० ते जवळपास २५००० एवढी असते. सपाच्या विषाच्या nuerotoxin मुळे मेंदू प्रचंड रिलॅक्स होतो. शरीरात वेगळीच energy येते नशेडीला सतत आनंदी वाटत राहते. दडपण नाहीसे झाल्यासारखे वाटते... हा इफेक्ट साधरणतः १ ते ३ आठ्वड्यापर्यंत राहतो. मात्र विषाचा इफेक्ट उतरला कि प्रचंड आळस थकवा आणि नैराश्य जाणवते. आणि पुन्हा विषाची चव घ्यायची हुक्की वाढते. म्हणजेच त्या विषाची लत लागते.

अशा प्रकारची नशा करणं वाइट आणि जीवघेणं आहे. यामुळे अनेक तरूणांची आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत. अनेक जण नैराश्याच्या गर्तेत लोटले गेले आहेत. त्यामुळे तुमच्या आसपास जर विषाची नशा करणारे तरूण-तरूणी असतील तर त्यांना वेळीच सावरा. विषाचा धंदा करणाऱ्यांची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला कळवा. सुरक्षित राहा, आनंदी राहा.

Updated : 11 Nov 2023 6:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top