Home > मॅक्स व्हिडीओ > गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या समाजाला परदेशात बाबासाहेबांची आठवण होते का?

गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या समाजाला परदेशात बाबासाहेबांची आठवण होते का?

गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या समाजाला परदेशात बाबासाहेबांची आठवण होते का?

गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या समाजाला परदेशात बाबासाहेबांची आठवण होते का?
X

अमानवी रुढी परंपरांच्या साखळदंडानी बांधलेल्या गावकुसाच्या बाहेर न पडता येणाऱ्या समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान रुपी कवच कुंडल देऊन बंधनमुक्त केलं.



शिका संघटित व्हा संघर्ष करा!


असा मूलमंत्र त्यांनी समाजाला दिला. या मूलमंत्रातून आंबेडकरी समाज सातासमुद्रापार जाऊन आपल्या कतृत्वार उभा राहिला.

आयटी, वैद्यकीय, इंजिनिअरींग आणि व्यवसाय क्षेत्रात आपला ठसा उमटवला. इतरांच्या तुलनेत हा आंबेडकरी समाज तसुभरही कमी नाही. 

बाबासाहेबांनी दिलेल्या संधीचं सोनं करत इथंपर्यंत भरारी घेणाऱ्या समाजाला परदेशात स्थायिक झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवतात का? परदेशात स्थायिक झाल्यानंतर तुम्हाला गावकुसाची आठवण होते का? अशा अनेक प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न मॅक्स महाराष्ट्रने केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंतीच्या निमित्ताने परदेशातील म्हणजेच अमेरिका, जपान, सौदी अरेबिया, बहरीन, युएई, आस्ट्रेलिया इथं असलेल्या आंबेडकरी अनुयायांशी मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी केलेली बातचीत केली पाहण्यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचा भीमजयंती स्पेशल कार्यक्रम.


भीमजयंती स्पेशल शो मध्ये आस्ट्रेलियाचे प्रकाश पुणेकर,ब्रुनेईचे डॉ. सुधीर कांबळे,बहरिनचे शैलेश पिल्लेवार, न्युझीलंडमधून विक्रांत वाकोडे, अमेरिकेतून संजय भगत, ओमानमधून संदीप मोहिते, सौदी अरेबियातून शिरीष सोनोने, स्वित्झर्लंड मधून देवेंद्र वानखेडे,जपानमधून डॉ. सुशांत गोडघाटे, युएएतून पंकज मेश्राम, युएसएमधून हेमंत चव्हाण, युएईमधून संदीप कर्णक यांनी सहभाग घेतला आहे.

Updated : 14 April 2021 1:52 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top