EWS आरक्षण : 5 टक्के लोकांसाठी दहा टक्के आरक्षण का? - हरिभाऊ राठोड
सर्वोच्च न्यायालयाने EWS आरक्षण कायम राहणार असल्याचा निर्णय दिला. त्यावरून सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रीया उमटत आहेत.
X
सर्वोच्च न्यायालयाने EWS आरक्षण कायम ठेवले आहे. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. मात्र माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी EWS आरक्षणावरून मोठा सवाल उपस्थित केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकीकडे जातीय आधारावर आरक्षण लागू आहेच. मात्र दुसरीकडे ज्या लोकांना जातीय आधारावर आरक्षण मिळत नव्हतं. त्यांना या निर्णयामुळे आरक्षण मिळणार आहे. याबरोबरच मराठा आरक्षणासाठीही या निर्णयाचा फायदा होणार आहे. अशा प्रकारचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रीया व्यक्त करताना माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी नाराजी व्यक्त केली. आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात येत असले तरी पाच टक्के लोकांसाठी दहा टक्के आरक्षण देणे योग्य नाही, अशी प्रतिक्रीया हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केली.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते संजीव भोर यांनी या निर्णयावरून सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. तसेच EWS आरक्षणामुळे 50 टक्क्यांच्या मर्यादेबाहेर आरक्षण दिले आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्गही मोकळा झाला असल्याचे मत संजीव भोर यांनी व्यक्त केले.