महाराष्ट्रात दलित मतं लुटली गेली, माजी खासदार अशोक सिद्धार्थ यांचे टीकास्त्र
भरत मोहळकर | 7 Dec 2022 1:10 PM IST
X
X
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर लाखोंचा जनसागर लोटला आहे. मात्र ही ताकद मतांमध्ये परिवर्तित होऊ शकली नाही. यामागे महाराष्ट्रातील आंबेडकरवादी पक्ष कारणीभूत आहेत. या पक्षांनी दलित राजकीय ताकद निर्माण करण्यापेक्षा बहुजन मतांना विविध पक्षांच्या दावणीला बांधले. त्यामुळे उत्तर प्रदेशात तीन वेळा आंबेडकरवादी विचारसरणीचे सरकार आले. मात्र महाराष्ट्र ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी असूनही आंबेडकरवादी पक्षांचं सरकार येऊ शकलं नाही. महाराष्ट्रात कायम दलित मतांमध्ये फूट पडून लूट करण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी खासदार अशोक सिद्धार्थ यांनी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांच्याशी बोलताना महाराष्ट्रातील राजकीय पक्षांवर केला.
Updated : 11 Dec 2022 9:09 AM IST
Tags: महापरिनिर्वाण दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr Babasaheb Ambedkar chaityabhumi political age of ambedkarite movements prakash Ambedkar Ramdas athavale Sandeep Tajane BSP Vanchit Bahujan Aghadi Ashok Siddharth bahujan samaj party
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire