Home > मॅक्स व्हिडीओ > नांदेडच्या युवा शेतकऱ्याने बनविली ; चार्जिंग बाईक

नांदेडच्या युवा शेतकऱ्याने बनविली ; चार्जिंग बाईक

देशात दररोज वाढणाऱ्या इंधनाच्या किमती आणि वाढत्या वाहनांमुळे वाढणारे प्रदूषणाचे प्रमाण यामुळे इलेक्ट्रीक वाहन अर्थात ई-बाईक ,मोटारगाड्या ही संकल्पना रुजू पाहते आहे ,अशा काळात नांदेडपासून जवळच असलेल्या अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगांव येथील ज्ञानेश्वर कल्याणकर या अवलिया युवा शेतकऱ्याने केलेला प्रयोग सर्वांनाच थक्क करायला लावणारा आहे .

नांदेडच्या युवा शेतकऱ्याने बनविली ; चार्जिंग बाईक
X

देशात दररोज वाढणाऱ्या इंधनाच्या किमती आणि वाढत्या वाहनांमुळे वाढणारे प्रदूषणाचे प्रमाण यामुळे इलेक्ट्रीक वाहन अर्थात ई-बाईक ,मोटारगाड्या ही संकल्पना रुजू पाहते आहे ,अशा काळात नांदेडपासून जवळच असलेल्या अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगांव येथील ज्ञानेश्वर कल्याणकर या अवलिया युवा शेतकऱ्याने केलेला प्रयोग सर्वांनाच थक्क करायला लावणारा आहे .

सतत दोन वर्षांच्या अथक प्रयत्नातून ज्ञानेश्वर कल्याणकर यांनी चार्जिंगवरील बाईक बनविली आहे . सतत नवनव्या खटपटी करून नवनवीन वस्तू बनविण्याच्या ज्ञानेश्वर यांच्या या अवलिया स्वभावामुळे ते आता या परिसरातील रँचो ठरले आहेत. शेतीतील कामे, बाजारपेठ, दळणवळणासाठी त्यांनी ही चार्जिंग बाईक बनविली आहे . फक्त १४ रुपयांमध्ये चार तास चार्जिंग केल्यानंतर ही बाईक तब्बल १०० किमी अंतर पार करते असा अनुभव ज्ञानेश्वर यांनी सांगितलाय. ही बाईक बनविण्यासाठी बॅटरीच्या दर्जानुसार ज्ञानेश्वर यांना साधारण २६ ते ३० हजार रुपये खर्च आला आहे . येत्या काळात आपल्या प्रयोगातून सदरील बाईकला २००० वॅटची बॅटरी बसविल्यास फसलेले ट्रॅक्टरही काढता येईल असा ज्ञानेश्वर यांचा दावा आहे.

Updated : 17 Feb 2022 12:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top