राज्यानं कोवीड काळात ५५ हजार कोटीचे कर्ज काढले : महसुलमंत्री बाळासाहेब थोरात
राज्यातील अतिवृष्टीनं मोठं नुकसान झाल्यानंतर सत्ताधारी- विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असताना महसुल मंत्री बाळासाहेब थोरांतानी केंद्राकडील थकीत हक्काचे ३० हजार कोटी मिळवण्यासाठी भाजपनं सहकार्य करावे अशी भुमिका घेतली आहे.
Admin | 20 Oct 2020 4:11 PM IST
X
X
राज्यातील अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतक-यांना निश्चितपणे मदत करण्याची सरकारची भुमिका आहे. कोविड काळात खर्च भागविण्यासाठी राज्य सरकारनं ५५ हजार कोटींचं कर्ज काढलं आहे. राज्याच्या हक्काचे जीएसटीचे थकीत ३० हजार कोटी मिळण्यासाठी भाजप नेत्यांनी सहकार्य करावे, अशी भुमिका महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे. पंचनाम्याचे आदेश दिले असून नुकसानीचा एकंदरीत आढावा घेऊन केंद्राच्या मदतीसाठी मेमोरॅंडम पाठविण्यात येईल, असे थोरात यांनी स्पष्ट केलं.
Updated : 20 Oct 2020 4:11 PM IST
Tags: balasaheb thorat covid corona
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire