Home > मॅक्स व्हिडीओ > राज्यमंत्री दत्ता भरणे यांना भररस्त्यात महिलेने विचारला जाब

राज्यमंत्री दत्ता भरणे यांना भररस्त्यात महिलेने विचारला जाब

राज्यमंत्री दत्ता भरणे यांना भररस्त्यात महिलेने विचारला जाब
X

आपल्या मुलावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत एका महिलेने राज्यमंत्री दत्ता भरणे यांना त्यांच्याच भरणेवाडी गावात भररस्त्यात जाब विचारल्याची घटना घडली आहे.

ही महिला माजी सरपंच असून शोभा चव्हाण असे तिचे नाव आहे. शोभा चव्हाण दत्ता भरणे यांच्या घरासमोर उपोषणाला बसल्या आहेत. त्यांचा मुलगा प्रफुल्ल चव्हाण यांच्यावर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे असा त्यांचा आरोप आहे. शोभा यांचा मुलगा प्रफुल्ल चव्हाण हा गेल्या वीस वर्षांपासून दत्ता भरणे यांचा कार्यकर्ता आहे आणि अशा कार्यकर्त्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

dda


Updated : 11 Jan 2021 8:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top