Home > मॅक्स व्हिडीओ > सात वर्षानंतर माझं मूल कुपोषित आहे, असं कुणी सांगत फिरत नाही: सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारला टोला

सात वर्षानंतर माझं मूल कुपोषित आहे, असं कुणी सांगत फिरत नाही: सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारला टोला

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी

सात वर्षानंतर माझं मूल कुपोषित आहे, असं कुणी सांगत फिरत नाही: सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारला टोला
X

"तुम्हाला काश्मिरी पंडितांबद्दल वाईट वाटत असेल, तर त्यांचा अर्थसंकल्पात समावेश करा, त्यांच्यासाठी वेगळ्या तरतुदी करा. नेहमीच गेल्या ६० वर्षांत त्यांच्यावर किती अन्याय झाला हे सांगणं गरजेचं नाही. तुम्हाला देखील सत्तेत येऊन सात वर्षे झाली आहेत. झालं ते सोडून देत तुम्ही का त्यांना मदत करत नाही. एखादं मूल जर कुपोषित असेल तर त्याची आई त्याला सात वर्षात चांगलं खायला देईल आणि त्यांला निरोगी करेल, कुपोषणातून बाहेर काढेल, माझं मूल कुपोषित आहे, असं सांगत फिरणार नाही," अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारला संसदेमधे सुनावलं आहे..

सरकारने अर्थसंकल्पात विस्थापित काश्मिरींसाठी काहीही केले नाही, असा आरोप सुळे यांनी केला. गेल्या ६० वर्षांत जे घडलं ते घडलं, पण पुढची किती वर्षे तुम्ही तेच बोलणार आहात. तेच ते ऐकून आता कंटाळा आलाय, असं सुप्रिया सुळे आज संसदेत बोलताना म्हणाल्या. लोकसभेत जम्मू आणि काश्मीरच्या अर्थसंकल्पावर चर्चा करताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सरकारनं भूतकाळात न जगता वर्तमान काळात जगावं, असा टोलाही त्यांनी लगावला.

Updated : 15 March 2022 10:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top