Home > Top News > BanonFacebook: मुस्लीम द्वेष कोणाच्या फायद्याचा... संजय सोनवणी

BanonFacebook: मुस्लीम द्वेष कोणाच्या फायद्याचा... संजय सोनवणी

BanonFacebook: मुस्लीम द्वेष कोणाच्या फायद्याचा... संजय सोनवणी
X

प्रसारमाध्यमांवर सरकारचा दबाव असल्याचा आरोप वारंवार केला जातो. पण आता फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही मोदी सरकारचा दबाव असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यावर सामाजिक कार्यकर्ते संजय सोनवणी यांनी दिलेली बोलकी प्रतिक्रिया नक्की पाहा...

कोरोना काळात हिंदू मुस्लीम असं वातावरण निर्माण झालं होतं? काही नेत्यांनी तर कोरोना वाढण्यास मुस्लीम समाज जबाबदार आहे. अशा पोस्ट केल्या होत्या. या सर्व पोस्ट धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या होत्या. मात्र, सोशल मीडियाच्या माध्य़मांनी या पोस्टवर काय कारवाई केली का? आता हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. या संदर्भात अमेरिकेतील The Wall Street Journal ने एक वृत्त प्रसारीत केलं आहे. या वृत्तात फेसबूक भाजपला कशा पद्धतीने मदत करत आहे. या संदर्भात सविस्तर माहिती दिल आहे.

मोदी (Modi) सरकार नाराज झाले तर फेसबुकच्या (Facebook) भारतातील व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत भाजप (BJP) नेत्याच्या मुस्लिम विरोधी पोस्टवर कारवाई करण्यास फेसबुकच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने विरोध केल्याची धक्कादायक माहिती या रिपोर्टमध्ये दिली आहे.

अमेरिकेतील The Wall Street Journal च्या वृत्तानुसार भाजपचे तेलंगणामधील आमदार टी. राजा सिहं (T. Raja Singh) यांच्या फेसबुक पोस्टला प्रक्षोभक वक्तव्यांचे नियम लागू करण्यास फेसबुकच्या भारतातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने विरोध केला होता. टी. राजा यांची एक पोस्ट, काही हिंदुत्ववादी लोक आणि समुहांच्या द्वेषाधारित पोस्ट या हिंसेला प्रवृत्त करु शकतात, असे फेसबुकच्या अंतर्गत धोरणानुसार सिद्ध झाले होते.

तरीही फेसबूकच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरुन या पोस्ट डीलिट करण्यात आलं नसल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संजय सोनवणी यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना समाजामध्ये तेढ निर्माण होईल. अशी कृती करणाऱ्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करावी. फेसबूक ने अशा प्रकारे वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी फिल्टर लावावीत. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय सोनावणी यांनी केली आहे.

Updated : 17 Aug 2020 3:46 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top