प्रेयसी मागासवर्गीय असल्याने पोलीस हवालदाराने लग्नाला नकार दिल्याचा आरोप
पूजा चव्हाण प्रकरणाने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेले असताना आता अंबरनाथमध्ये एका पोलीस हवालदारावरच बलात्काराचा गुन्हा नोंदवला गेला आहे.
X
सध्या राज्यात पूजा चव्हाणचे मृत्यू प्रकरण गाजत आहे. पण आपल्या देशात अत्याचाराला देखील ग्लॅमर असले तरच त्याची चर्चा होतेका असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण देशाच्या कान्याकोपऱ्यात हजारो महिला मुलींवर अत्याचार होतात. कल्याणमध्ये एका पोलीस हवालदाराने लग्नाचे आमीष दाखवून एका तरुणीशी लैंगिक संबंध ठेवले. पण त्यानंतर माक्षत्र ती मागासवर्गीतली असल्याने लग्न करुन शकत नाही असे कारण दिल्याचा आरोप या पीडित तरुणीने केला आहे.
पीडित तरुणीही इंजिनिरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीला आपल्या प्रेमात फशी पाडले, खोटे मंदिरात लग्न लावले, तिच्या मना विरुद्ध शरीर संबंध केले आणि जेंव्हा हे संबंध सार्वजनिक करण्याची वेळ आली, तेंव्हा मात्र तू खालच्या जातीची आहे, माझ्या घरचे तुला स्वीकारायला तैयार नाही म्हणून सोडून देऊन दुसऱ्या लग्नाचा घाट रचला.. काय आहे या तरुणीची आणि कुटुंबाची व्यथा?
मिलिंद हिंदुराव असे या पोलीस हावालदाराचे नाव असून त्याच्याविरोधात पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दिल्यापासून तो फऱार आहे. पण या तरुणीला आपली तक्रार दाखल कऱण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागल्याचे तिने सांगितले आहे. एका राजकीय पुढाऱ्याने तर 20 लाख रुपये घ्या आणि गप्प बसा असा सल्ला दिल्याचा आरोप तिने केला आहे. तर पोलीस खात्याने चक्क दीड महिना गुन्हाच न नोंदवता तरुणी आणि तिच्या कुटुंबाला फिरवत ठेवले असा आरोपही तिने केला आहे. पण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या पीडित तरुणीने दाद मागितल्यानंतर त्यांनी आदेश दिले आणि मग यंत्रणा हलली. मिलिंद हिंदुरावविरोधात बलात्कार आणि एट्रॉसिटीचा गुन्हा कऱण्यात आला आहे.
एकीकडे गुन्हा तर दाखल झाला पण त्यानंतर आजही आपल्याला जिवेठार मारण्याची धमकी मिळते आहे, असा आरोप या तरुणीने केला आहे. आपण फसवले गेलो या धक्क्याने निराश झालेल्या या तरुणीने 2 वेळा आत्महत्येचा प्रयत्नही केला आहे. आता त्या आरोपीला शोधून शिक्षा करावी अशी मागणी तिने केली आहे.
पोलीस विभागाचे म्हणणे काय?
यासंदर्भात आमचे प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्तालयात जाऊन एसीपी नरळे यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी बलात्कार आणि एट्रॉसिटीच्या प्रकरणात कोर्टाचा निकाल येत नाही तोपोर्यंत माध्यमांशी बोलायचे नाही असे आदेश असल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.