Home > मॅक्स स्पोर्ट्स >  स्वतंत्र क्रीडा खाते बंद करून काय साधले (भाग २)

 स्वतंत्र क्रीडा खाते बंद करून काय साधले (भाग २)

 स्वतंत्र क्रीडा खाते बंद करून काय साधले (भाग २)
X

भ्रष्टाचार क्रीडा संचालकांचा या अंतर्गत भरती प्रक्रियेत, शिपाई, ड्रायव्हर व अन्य कर्मचारी यांच्या साठी भाव निश्चित असायचे एवढेच नव्हे पदांचीही विक्री होत असे त्यांच्यापैकी आज कोणी खात्यात शिल्लक राहिला असेल तर तो स्वतःची कर्मकहाणी नक्कीच सांगेल. पंचवीस वर्षा पूर्वी क्रीडा व युवा सेवा संचालयानयात जिवंत मुडदे अनेक होते.

शासकीय कार्यालयातील आधिकाऱ्याचे मद्य प्रताप

मिश्रा, विजय देशमुख, जेवढे उपसंचालक तेवढ्या ढोंब्याचे सत्तेचे संघ - समूह. यातल्या अनेकांना भ्रष्टाचारात पकडलेही होते. तरीही हे बेशरम संचालकास रात्रप्रहरी दारूच्या बाटलीत भरत असत. त्या प्रहरात प्राप्त होणाऱ्या मायेचे समसमान वाटप. पुढे वार्षिक उत्पन्न अनुदान, टक्केवारी व्यापार यांच्यातून साध्य करत. १९८५ पर्यंत तर या खात्यात वेतन हे पेन्शनच होते. कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण म्हणून नव्हता. भंटाळे साहेब यांची तर जिथे बदली तेथे विवाह अशी ख्याती होती. अलिबाग - ठाण्यात करून ठेवलेला जमीनजुमला वेगळाच.

अनुदान हा खात्यातील सर्वांचा लाडका विषय. एखाद्या व्यायामशाळेला खात्याकडून आर्थिक मदत द्यायची झाल्यास गणित केले जायचे. प्रथम अनुदानाची रक्कम आधिक सर्वांचे एकमत होऊन ठरलेली टक्केवारी. तर ही टक्केवारी रोख रकमेत प्रथम वसूल केली जायची. मग व्यायामशाळेच्या पदाधिकाऱ्यांना पढवून त्यांनी भाड्यानी आणलेली वजने व अन्य साहित्य उभारून व्यायामशाळेचा सेट उभा केला जायचा. तिची कागदपत्रे तयार व्हायची. अनुदानाचा चेक हातात येताच सेट विसर्जित व्हायचा.

शासनाचा आवडीचा खेळ म्हणजे कुस्ती. कोवळ्या वयातील मुलांपासून तरण्याबांड गुणी खेळाडूंपर्यंत अनेकांना आहार तसेच अन्य बाबींसाठी भत्ता स्वरूपात काही रक्कम खात्याने निश्चित केली होती. मात्र भत्ते मिळवणाऱ्यांनी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केला कारण त्यांच्या हक्काच्या रकमेवर संबंधित आधिकारी डल्ला मारत असत. खेळ - खेळाडूंची अशी अवहेलना केवळ खुर्चीला चिकटलेले फकीरच केवळ करू शकतात.

एल. डी. चौधरी या उपसंचालकांचे नाव घेण्याजोगे आहे. राज्य शासना विरूध्द धनुष्य बाण, ढाल तलवार, एके – ४७ अस सर्व त्यांनी चालवलं. कोर्ट कचेरीतही मागे हटले नाही. टोपी उडो, कपडे फाटोत किंवा चप्पलांचे झिजून तीन तुकडे होवोत... ते झगडत राहिले. व संचालकपदी पोहचले. त्यांना अनेकांची साथ लाभली. त्यातील महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र दर्शनचे मानकरी माजी संचालक मा. पा. साळुंके. हे खेळाशी संबंधित नव्हते किंवा भाप्रसे मधलेही नव्हते. परंतु कांदवली येथील इतिहासजमा झालेल्या एका शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. असे कर्तबगार लोक आज केवळ भाप्रसेमधून नाहीत या कारणामुळे नाकारले जातात.

एका सुकाळाने तर जो दुष्काळ खंडातून येऊन सचिवपदी बसला होता, संचालकाच्या स्वाक्षरीचे प्रत्येक कागदपत्र झेरॉक्स करून प्रत आपल्या ताब्यात ठेवली होती. कारण पुढेमागे संचालकाला त्याद्वारे ब्लॅकमेल करता यावे. या महाभागाने मुंबईतील उपसंचालकाचे कार्यालय कायमचे बंद करण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले होते.

नमुना क्रीडा राज्यमंत्री

आता नमुना पहा क्रीडा राज्यमंत्र्याचा. त्यास तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र कारभार सुपूर्द केला होता. पात्रता काय तर केवळ खेळातील एक कार्यकर्ता. असल्या अयोग्य कार्यकर्त्यांच्या पायी खेळ ऑलिंपिकमधून हाकलला गेला.

(बदलले नाव) हे आहेत मिस्टर बाम. सुशिक्षेतेचा अभाव सरकारी खात्यातील शिपाया सारखे बोलणे वागणे. याचा कार्यकाळ म्हणजे अमावस्यापर्व. तर दुसरी व्यक्ती बालिश शाम खष्टीकर ज्या खेळास फारसे महत्तव कोणी देत नाही... समाजातील काही आर्थिक दुर्बल घटक, नगरपालिका शाळा, काही विशिष्ट भाषिक माध्यमाच्या शाळा सोडल्या तर उच्चप्रभू घटकात या खेळाकडे कोणी ढुंकूनही कोणी पाहत नाही. फार काही वर्षांपूर्वी हाणामारी करणाऱ्यांचा खेळ अशी त्याची ओळख होती.

तर हा बालबुध्दी मंत्री कायम लक्षात राहिला कारण राज्याच्या क्रीडाजगताशी त्याचा काडीइतकाही संबंध आला नाही. त्याला वेळच नसायचा. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी उद्योग खातेही त्याच्याकडे दिले असल्याने त्याचे अनेक उद्योग चालू असायचे. ते म्हणजे कांदे, बटाटे, केळे, आंबे, जावबा, खावबा, विजय, गाय नामक वाड्या, लेन आशांचा हुतूतू चालायचा दहा टक्के कोट्यातील सदनिका मिळवून देण्यासाठी शिफारस, प्रमाणपत्र देण्यात पटाईत याच्या कारकिर्दीत केंद्र व राज्यशासनाने गौरवलेल्या व आंतरराष्ट्रीय मान सन्मान मिळवलेल्या खेळाडूंना हेतुपुरस्सर वंचित ठेवण्यात आले. हा विषय मुंबई उच्च न्यायालयात गेला पण त्यावर स्थगिती आली. या व्यक्तीच्या कर्मामुळे राज्यशासनाची छीथू झाली. शिवछत्रपती पुरस्कार तर त्याने फूटपाथ छाप करून टाकला. आपल्या प्रशिक्षकास हा पुरस्कार मिळवून द्यायचाच असा निश्चय केलेल्या एका कसोटी क्रिकेटपटूने त्या काळात प्रयत्न केले तेव्हा एकाच खेळाचे दोन पुरस्कार दोन प्रशिक्षकांना दिले गेले.

कै. श्री. वसंतराव अमलाडी एमआयएससाईचे १९६२ पासूनचे प्रशिक्षक. गावस्कर, सोलकर, अझरुद्दीन, राजीव कुलकर्णी असे अनेक कसोटीपट्टू त्यांनी देशाला दिले. तर माझ्यापासून शिशिर हट्टगंडी, अनंत सोलकर, नितिन वाडकर, मिलिंद रेगे असे अनेक प्रथम श्रेणीत खेळणारे खेळाडू घडविले ज्यांची संख्या अफाट आहे. असा प्रशिक्षक झाला नाही ना होणार. मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्र किंबहुना देशभरात या प्रशिक्षकाने खेळाडू घडवावयाचे; परंतु असे तयार झालेले खेळाडू ज्यावर स्वतःचा हक्क नसतो ते आपल्या भवितव्यासाठी पोदार कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन पदवी मिळेपर्यंत किमान चार वर्ष तरी त्यांचे प्रतिनिधित्व करतात. तेव्हा वयोवृध्द कै. विठ्ठल पाटील म्हणतात की मी यांना घडविले व पुरस्काराचे लाभार्थी होतात. अशी निवड शासन तसेच क्रीडा खाते योग्य ठरवते.

ज्या विठ्ठल पाटलांनी कांगा स्पर्धेचे ७०० सामने खेळून ७०० गडी मिळवले व तेवढ्याच सामन्यांत खेळून फलंदाजीत त्यांच्या कारकीर्दीत ७० धावाही झाल्या नसतील असे असूनही या मंत्र्याने हा पुरस्कार किती स्वस्त केला आहे याचे हे ज्वलंत उदाहरण. या मंत्र्याच्या बुद्धिमत्तेची कीव करावी तेवढी थोडीच. टीका करताना तो म्हणतो, एक मूर्ख (फलंदाज) चेंडू फटकारतो नि १० मूर्ख तो पकडण्यासाठी धावतात. हे असे वक्तव्य करणाऱ्याला तुम्ही काय म्हणाल?

याच्या कारकीर्दीत एकच गोष्ट अभिनव झाली ती म्हणजे कांदिवली येथे शासनाच्या शारीरिक महाविद्यालयाची जमीन झोपडपट्टीवासियांनी अधिक गिळंकृत करू नये म्हणून केंद्रशासित स्पोर्टस् अथॉरिटी ऑफ इंडियास पाचारण करून त्यांचे मुंबईत अर्थात उपनगरात प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी सर्वतोपरी हातभार लावला.

माजी मुख्यमंत्री यांचे लाडके (बदललेले नाव) काकाकुवा वाळवी शिक्षणपात्रता दोन आकडी १०वीही पास नसेल. कामधंदा म्हणाल तर सॉर्टर. पोस्टात पत्रे वेगवेगळी करून पोस्टमनला सोपवण्याचे. वास्तव्य कुठे... तर मुख्यमंत्र्यांच्या १० टक्के कोट्यातून मिळेल तिथे. त्या बाबतीत तज्ज्ञच. यांना मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून मुख्यालयात केबिन. गाडी वगैरे. हे कमी पडले की काय म्हणून यांचे मुलींशी गैर वागणे.

तर अशा या खाष्टेकर- वाळवी यांनी हातात हात घालून इतर खेळांचा सर्वनाश केला. यासाठी कोणताही खेळाडू त्यांना माफ करणार नाही.

(समाप्त)

Updated : 29 Sept 2017 8:31 AM IST
Next Story
Share it
Top