राष्ट्रीय क्रिकेट मंडळाची प्रगती तर प्रशासनाची अधोगती
X
आज सकाळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे एक महत्वाचे पदाधिकारी विनोद राय यांनी आपल्याला प्राप्त झालेल्या अधिकारात एक जाहीर फर्मान काढले. भारतीय क्रिकेट संघासाठीची प्रशिक्षकाची निवड आजच्या आज होवून नाव जाहीर झाले पाहिजे अशा आशयाचे बंधनकारक आदेश संबंधीतांना दिले. वाहिन्यांना खाद्यपुरवठा झाला. त्यानंतर मात्र दिवसभर राष्ट्रीय व प्रादेशिक वाहिन्यांवर ही बातमी सतत झळकत राहीली. टीआरपी चषकासाठी त्यांच्यातच स्पर्धा आयोजनाचे सामने सायंकाळपर्यंत रंगले. चढाओढ, वर्चस्वासाठीचे तत्वज्ञान याचा बोध मात्र चुकीच घेण्यात आला. वाहिन्यांचे अर्धवट आणि खेळाचे काडीमात्र ज्ञान नसलेले किंबहुना कधीही संबंध न आलेले प्रतिनिधी व त्याच तोडीचे त्या त्या वाहीनीचे गोंडस विशेषण धारण करुन क्रीडा संपादकाचा मुकुट घालणारे यांच्या माफक कल्पकतेने रंगविण्यात आलेले चर्चासत्र ह्यातून केवळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रशासनाचे धिंडवडे निघाले.
क्रिकेट विश्वात यातून कोणते संदेश गेले असतील याची कल्पना न करणे हे शहाणपणाचे ठरेल. सायंकाळी सर्वच वाहिण्यांना आपापले सामने अनिर्णीत अवस्थेत सोडून द्यावे लागले. सायंकाळी कायदा-वायद्याचे बंधन आम्हास मान्य आहे. तेच आमचे प्रशासन राहील, आमच्यात सुसुत्रता किंवा सुसंवाद नाही याची प्रचिती इतरांना येवूनही याची वाच्चता-कबुली न देता कालच्या अनिर्णायक अवस्थेतच मंडळाचे सचिव अमिताभ चौधरी यांनी हे प्रकरण नेवून ठेवून घेतलेली पत्रकार परिषद संपविली. ओढावून घेतलेल्या परिस्थितीवर ''दिल का हाल तुने दिलवाला, छोटीसी बीतेय मिर्ची मसाला, देखते रहेगा देखनेवाला, दिल का हा सुने दिलवाला'' या गाण्याच्या पंक्ती गावून आपल्या इतर सहकाऱ्यांचे सांत्वन करुन तात्पुरती वेळ मारुन नेली. हसेही करुन घेतले.
मंगळवारच्या मंगळाने मंडळास मात्र झटका दिला. मंडळाच्या यापुर्वीचा कारभारही गलथानच होता व आताही तसाच आहे. अपेक्षित सुधार नाही हे मात्र सिद्ध झाले. आपल्या भावटी-भानामती मांत्रिक तांत्रिक विद्येने मंडळाचे पदाधिकारी सध्या जागीच चमत्कार करुन कार्यालयीन तिसऱ्या पाळीत याने जाहीर करु शकतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे आम जगातील सर्व क्रिकेट खेळणाऱ्या मंडळापेक्षा गणना करणेही शक्य नाही एवढे श्रीमंत आहे. क्रिकेट विश्वातील सर्वच मंडळांना एकाच वेळी काही तासातच विकत घेण्याची क्षमता आपल्या मंडळात आहे. हे पूर्वी नव्हते. रेल्वे, एसटीचा प्रवास, देशाचे प्रतिनिधीत्व करुनही मानधन तीन आकड्याचे ते ही भत्यासहीत. आपल्याच पदरचे पैसे खर्च करुन पुर्वीचा खेळाडूंनी खेळाची सेवा केली. खेळाचा प्रचार प्रसार केला. राजा महाराजांचाही या खेळास आणि खेळाडूंना आर्थिक सहाय्य पाठबळ देवून त्यांना जोपासले. याची फळे आपणास चाखावयास मिळत आहेत.
''सबका साथ, सबका विकास'' म्हणून मंडळाला जगमोहन दालमिया व ललित मोदी पदाधिकारी म्हणून लाभले. या उद्योगपतींनी मंडळाचा खजिना भरला म्हणूनच आज भारतीय क्रिकेटला कसलीही कमतरता नाही. खजिनदार संघटनांनी मंडळाचे करोडो रुपये हर्षद मेहता घोटाळा प्रकरणी गुंतवले. परंतु आजवर या विषयाची चर्चा नाही हाच श्रीमंतीचा पुरावा. मंडळात सुबेर सुतकाचे भाष्य केले जात नाही. कोणताही बाका प्रसंग उद्भवल्यास सर्व एकगीत येवून कोट्समध्ये सुरताल लयबद्ध घेवून ''ए मालिक तेरे बंदे हम'' ची बंदीश आठवतात. कोणतेही प्रकऱण गुलदसत्यात जाण्याचा मार्ग मोकळा तसेच सुखवकर होतो. आपण ही एक प्रथाच समजावी.
''ऐसा मोका फिर कहा मिलेगा, तुम्हारे जैसा क्रिकेट कौन खेलेगा, आओ तुमको दिखलाता हू वल्ड कप की रंगीन शाम देखो देखो'' अन ''इव्हिनीग इन इग्लंड़'' या गाण्याचा डोस भारताचा तत्कालीन संघनायक कपिल देव याने आपल्या संघापासून बलाढ्य वेस्ट इंडिज संघास आपल्या संघाची माफक धावसंख्या असूनही चारी मुंड्या चीत करुन १९८३ साली वल्ड कप जिंकणं भारतीय क्रिकेटसाठी ही संजीवनी ठरली. यानंतर आजपर्यंतच्या काळात फिक्सींग प्रकरण अंगावर ओढवून घेणारा पुढे पंचाचा आधार घेवून लोकसभेचा खासदार होणारा अझरुद्दीन दुसरे नाव घेण्यामागे आहे. ते बंगालच्या बायकॉटने नामकरण केलेला ''पिंन्क ऑफ कठकता'' अर्थात इतरांचाही लाडका बंगाल टायगर याने ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टॉव्ह वॉ आणि इंग्लंडच्या नासीर हुसैन या दोघांनाही नाणेफेकीपुर्वी त्याची वाट पाहण्यास भाग पाडून अप्रत्यक्ष शिक्षाच करुन स्वत:चे मानसशास्त्राने पाणी चाटवण्यास भाग पाडले.
क्रिकेटची मक्का अर्थात लील मैदानाच्या गॅलरीतून संघाचा सराव करताना अंगावरील शर्ट काढुन हवेत गरगरा फिटवून इग्लंड संघास स्वत:ची बोटे घशात घालण्यास भाग पाडणारा एकमेव अर्थात सौरव गांगुली. बंगालने भारतात पंचम रॉय, अंबर रॉय गोपाळ बोस, सुब्रतो गुहा, दिलीप दोषी, रुसी मिमीमॉय, असे अनेक रसगुल्लेरुपी खेळाडू दिले. त्यातील गांगुली म्हणजे शुद्ध घी का गुछा पाहून त्याची कारकीर्दही तशीच अंतमात्र गोड झाला नाही. सुपल्या घेवून देवून त्यास संघाबाहेर काढण्याचे षडयंत्र एकून त्याची अंमलबजावणीही यशस्वीरित्या केली गेली. एका दीडफुटी निवड समिती अभ्यासक तर त्याला १२ वा खेळाडू म्हणून पाहण्याची इच्छा होतो व या निलामऱ्याने ती व्यक्तही केली. परंतु गांगलीने स्वत:वर ती वेळ येवू दिली नाही किंवा संधीही दिली नाही. आज किरण नावाची किरणे कोठेही दिसत नाहीत. परंतु गांगुली मात्र उच्चपदी विराजमान आहे. त्याचा किरणांची माहिती साऱ्या विश्वाला आहे.
''छोडो ये दिवानो अपना काम करो – मेरा नाम बदनाम ना करो''
असे ठणकवणाराही तो एकमेवच, सुनील गावस्कर हे कर्णधार म्हणून महान तसेच आदर्श प्रेमाची सावली या चित्रपटाने त्याने सिद्धही केले आहे. बेरीज वजाबाकीत शेवटचे नाव म्हणजे धोनी. त्याने तर विक्रम मोडून सर्व विश्वस्पर्धेत विजय मिळवून एक यशस्वी कर्णधार म्हणून क्रिकेट इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरुन ठेवलेले आहे. तसेच अनेक खेळाडूंचे बळी त्याने घेतलेले आहेत ही मात्र शोकांतीका. विराट हा नावाप्रमाणे अफाट आहे. आज शिखरावर आहे. तेथे स्थिर राहणे सर्वांनाच शक्य होत नाही. जीवनमुल्ये पाळली तरच सहज सुलभ होईल. अन्यथा भारताने पोत्यात राहतील एवढे कर्णधार पाहीले, परंतु त्यांची नावे मात्र रसिकांना आवडत नसतील त्यात समाविष्ठ होईल.
''ओ जानेवाले हो सके तो लौटके आना म्हणण्याची पाळी येईल. शेवटच्या ३५० वर आकडा असलेल्या खेळाडूंनाही खेळाची वैभवप्राप्ती मिळवून दिली आहे. अशा या कप्तानांमुळे खेळाचा प्रचार प्रसार तर होतोच आहे. सोबत मंडळांचीही चलती आहे. ''तु नही और नही और नही तो और सही'' एवढ्या मोठ्या संकटात आज या खेळात पुरस्कर्ते लाभलेले आहेत. पैशांची गंगा आपल्यासाठी तर वाढतच आहे. इतर देशांना नर्मदा–सरस्वतीचा फायदा होत आहे. खेळ-खेळाडू आपोआप जात आहेत. पराभव सामन्यातील जाहीरातींचे फलकांकडे पाहिल्यास प्रत्येकाच्या कमाईचा अंदाज घेणे सोपे जाईल. संघातील निवड झालेल्या इतर खेळाडूंच्या कामगीरीचा आनद घेण्यासाठी हजारोंमध्ये प्रेक्षकवर्ग स्टेडीयममध्ये येतो ही मंडळाची कमाई म्हणजे बोनसच असतो.
संघातील निवड झालेल्या इतर खेळाडूंच्या कामगीरीचा आनंद घेण्यासाठी हजारोंमध्ये प्रेक्षकवर्ग स्टेडीयममध्ये येतो ही मंडळाची कमाई म्हणजे बोनसच असतो. याला अपवाद म्हणजे या कमाईतील काही भाग- हिस्सा आयसीसी ला द्यावा लागतो. हा नियम सर्व देशांना लागू पडतो. या कमाईतून मग आयसीसी क्रिकेटचा प्रचार-प्रसार आणि सभासद देशांना आर्थिंक मदत करुन त्यांचीही प्रगती करुन त्यांना मूूळ प्रवाहात आणते सध्याच्या काळात अफगाणिस्तानात तसेच झिंबाब्वेत याचा फायदा झालेला आहे. नुकत्याच झालेल्या मालिकेत झिबाब्वेने श्रीलंकेस हरवून मालिका खिशात घातली. तर अफगाणिस्तानच्या एका फलंदाजाने द्विशतक झळकावून आयसीसी ला त्यांनी केलेल्या मदतीची आपल्या कामगिरीने परतफेडच केली आहे. श्रीलंकेची कर्णधार मॅथ्युजला तर कप्तानपद नकोसे झाले. त्याने नमो नमो श्रीलंका म्हणत पदाचा राजीनामा दिला.
भारतीय नियामक मंडळ आयसीसी ला जास्ती महत्व देत नाही. अनेकदा जुमानत नाही. आपल्याच देशाचा एक प्रतिनीधी अध्यक्षस्थानी विराजमान होेतो. हा इतिहास आहे. भांडवलदार भारतच आहे. आर्थिक प्रवाहाचे केंद्र भारत असल्याने त्यांना जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आपणास हवे ते निर्णय ते देतात व सदैव राखून ठेवतात. आयसीसीचे सामनाधिकारी मात्र आपल्या खेळाडूंना कोणत्याही सामन्यादरम्यान झालेल्या चुकीला झुकते माप देत नाहीत. हे सर्व आशिया खंडातील सर्व देशांच्या संघ खेळाडू यावर व्यवस्थित बारकाईने नजर ठेवून कार्यवाही करुन मनशांती साधतात. गोऱ्यांना हे गोरे मग सदैव-सर्वत्र सांभाळून घेतात. त्यांच्यासारखा एकोपा आशिया खंड साधू शकेल का? आयसीसी पॅनलमध्ये आमच्या किती प्रतिनीधींना तसेच पंचांना आज स्थान आहे याचा अभ्यास आमचा अस्थिर मंडळाने करणे गरजेचे आहे. यावर कृती, पाठपुरावा होवून न्याय अपेक्षित आहे. मंडळातील कोणते कार्यक्रम याची कार्यपूर्ती करेल त्याचे नाव मंडळ जाहीर करु शकेल?
येणाऱ्या काळात मेक इन इंडिया चळवळीत मंडळही हौशीने भाग घेईल. प्रयोगशीव तत्वावर खेळाडूंच्या उत्कर्षासाठी तसेच देशहीत जपून सूचनांचा विचार घेवून कार्यक्रमाची आखणी अंमलबजावणी विद्वान तज्ञांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे. मंडळाचे सहकार्य-सहयोग-सहभाग भविष्य घडवू शकतो. पण जर-तर ला महत्वा न देता आम्ही त्यांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या सूचना कराव्या का?
छोडो कल की बातें, कल की बात पुरानी |
नये दौर मे लिख देंगे मिलकर नई कहानी |
हम हिंदूस्थानी |
सकाळच्या प्रहरात विनोद राय यांनी नावातील विनोदास महत्व न देता आपले मत अर्थात राय चा प्रहार केला. छान मर्मी लागला. मंडळाच्या सचिवांनी ‘खयालों की बिर्याणी’ केली. सोबत वालाचे मिट्स, आळवाचे फतफते, पिठले यामध्ये उपस्थित प्रश्नांचे मिश्रण करुन पत्रकार परिषदेत वेळ मारुन नेली. सायंकाळी ६ वाजता विमानाने गांगुली ८३० वाजता कलकत्यात पोहोचला. निर्णय अद्याप विचाराधीन अवस्थेतच आहे असे जाहीर झाले. तुम्ही आम्ही झोपेत असतांना निर्णय जाहीर झाले. ''विराट अमेरिकेत तर शास्त्री बोला दाजीबा च्या अवस्थेत’’. आम्ही तो संशय व्यक्त केला होता तो खरा ठरला. याला आपण बेबंदशाही, संशयकल्लोळ का वस्त्रहरण म्हणाला ? यातील ऑडीशन पात्रांची नावे, त्यांचे कर्तृत्व-पात्रता-अनुभव आणि योग्यता यावरील भाष्य ऐका पुढील लेखातृ
देशवासीयों आपको क्या सुनाएँ |
आपके सामने मंडल के क्या हाल हैं |
संघातील निवड झालेल्या इतर खेळाडूंच्या कामगीरीचा आनद घेण्यासाठी हजारोंमध्ये प्रेक्षकवर्ग स्टेडीयममध्ये येतो ही मंडळाची कमाई म्हणजे बोनसच असतो. याला अपवाद म्हणजे या कमाईतील काही भाग- हिस्सा आयसीसी ला द्यावा लागतो. हा नियम सर्व देशांना लागू पडतो. या कमाईतून मग आयसीसी क्रिकेटचा प्रचार-प्रसार आणि सभासद देशांना आर्थिंक मदत करुन त्यांचीही प्रगती करुन त्यांना मूूळ प्रवाहात आणते सध्याच्या काळात अफगाणिस्तानात तसेच झिंबाब्वेत याचा फायदा झालेला आहे. नुकत्याच झालेल्या मालिकेत झिबाब्वेने श्रीलंकेस हरवून मालिका खिशात घातली. तर अफगाणिस्तानच्या एका फलंदाजाने द्विशतक झळकावून आयसीसी ला त्यांनी केलेल्या मदतीची आपल्या कामगिरीने परतफेडच केली आहे. श्रीलंकेची कर्णधार मॅथ्युजला तर कप्तानपद नकोसे झाले. त्याने नमो नमो श्रीलंका म्हणत पदाचा राजीनामा दिला.
भारतीय नियामक मंडळ आयसीसी ला जास्ती महत्व देत नाही. अनेकदा जुमानत नाही. आपल्याच देशाचा एक प्रतिनीधी अध्यक्षस्थानी विराजमान होेतो. हा इतिहास आहे. भांडवलदार भारतच आहे. आर्थिक प्रवाहाचे केंद्र भारत असल्याने त्यांना जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आपणास हवे ते निर्णय ते देतात व सदैव राखून ठेवतात.
आयसीसीचे सामनाधिकारी मात्र आपल्या खेळाडूंना कोणत्याही सामन्यादरम्यान झालेल्या चुकीला झुकते माप देत नाहीत. हे सर्व आशिया खंडातील सर्व देशांच्या संघ खेळाडू यावर व्यवस्थित बारकाईने नजर ठेवून कार्यवाही करुन मनशांती साधतात. गोऱ्यांना हे गोरे मग सदैव-सर्वत्र सांभाळून घेतात. त्यांच्यासारखा एकोपा आशिया खंड साधू शकेल का?
आयसीसी पॅनलमध्ये आमच्या किती प्रतिनीधींना तसेच पंचांना आज स्थान आहे याचा अभ्यास आमचा अस्थिर मंडळाने करणे गरजेचे आहे. यावर कृती, पाठपुरावा होवून न्याय अपेक्षित आहे. मंडळातील कोणते कार्यक्रम याची कार्यपूर्ती करेल त्याचे नाव मंडळ जाहीर करु शकेल?
येणाऱ्या काळात मेक इन इंडिया चळवळीत मंडळही हौशीने भाग घेईल. प्रयोगशीव तत्वावर खेळाडूंच्या उत्कर्षासाठी तसेच देशहीत जपून सूचनांचा विचार घेवून कार्यक्रमाची आखणी अंमलबजावणी विद्वान तज्ञांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे. मंडळाचे सहकार्य-सहयोग-सहभाग भविष्य घडवू शकतो. पण जर-तर ला महत्वा न देता आम्ही त्यांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या सूचना कराव्या का?
छोडो कल की बातें, कल की बात पुरानी |
नये दौर मे लिख देंगे मिलकर नई कहानी |
हम हिंदूस्थानी |
सकाळच्या प्रहरात विनोद राय यांनी नावातील विनोदास महत्व न देता आपले मत अर्थात राय चा प्रहार केला. छान मर्मी लागला. मंडळाच्या सचिवांनी ‘खयालों की बिर्याणी’ केली. सोबत वालाचे मिट्स, आळवाचे फतफते, पिठले यामध्ये उपस्थित प्रश्नांचे मिश्रण करुन पत्रकार परिषदेत वेळ मारुन नेली. सायंकाळी ६ वाजता विमानाने गांगुली ८३० वाजता कलकत्यात पोहोचला. निर्णय अद्याप विचाराधीन अवस्थेतच आहे असे जाहीर झाले. तुम्ही आम्ही झोपेत असतांना निर्णय जाहीर झाले. ''विराट अमेरिकेत तर शास्त्री बोला दाजीबा च्या अवस्थेत’’. आम्ही तो संशय व्यक्त केला होता तो खरा ठरला. याला आपण बेबंदशाही, संशयकल्लोळ का वस्त्रहरण म्हणाला ? यातील ऑडीशन पात्रांची नावे, त्यांचे कर्तृत्व-पात्रता-अनुभव आणि योग्यता यावरील भाष्य ऐका पुढील लेखात
देशवासीयों आपको क्या सुनाएँ |
आपके सामने मंडल के क्या हाल हैं |