क्रिकेट नियामक मंडळ : नियुक्तीची खैरात
X
‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाना’ या शब्दाप्रमाणेच प्रशासन असल्याचे क्रिकेट नियामक मंडळाकडे पाहून वाटते. कसोटी क्रिकेट, एक दिवसीय आंतरराष्ट्रीय 50 षटकांचा सामना अथवा टी-20, सलग विश्रांतीविरहित पाच दिवस, चेंडूच्या मर्यादित व 120 चेंडू हे दोन्ही देशांच्या संघात देऊन, सामन्याच्या स्थळ-वेळा ज्यात दिवस व रात्र याचा अंतर्भाव करून पंचाच्या नेमणुकांसहित वेळापत्रकानुसार मंडळ व आय. सी. सी. च्या नियमानुसार असे सामने खेळविले जातात. या तीनही प्रकारच्या खेळविण्यात येणाऱ्या सामन्यांच्या भारतीय संघाची निवड नियामक मंडळाने नियुक्त केलेल्या पाच जणांची निवड समिती करते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे संलग्न सदस्य असलेल्या पूर्व-पश्चिम दक्षिण- उत्तर व मध्य या पाच विभागातून प्रत्येकी एक यान्वये पंचायत प्रतिनिधींचे गठन करण्यात येते. मंडळाची अपेक्षा असते की ही त्यांची कमिटी त्यांना दिल्या गेलेल्या कालमर्यादेत आपली कर्तव्यकर्म त्यांनी जबाबदारीने पार पाडतील.
निस्वार्थी निपक्षपातीपणा त्यांच्या कार्यातून दिसून येईल.. त्यांनी एक चित्त- एक मत एक शब्द यांची सांगड घालून निवडलेला संघ त्यातील प्रत्येक देशासाठी प्रतिनिधित्व करणारा खेळाडू हा त्यांच्या असलेल्या कलागुणांनी मिऴालेल्या संघाने सोनं करून समाधानकारक प्रदर्शन करून देशांचा सन्मान वाढवेल. भारतीय संघ कुठलाही परदेशदौरा करतो किंवा परकीय देशांचा संघ भारत दौऱ्यावर येतो तेव्हा, संघ निवडीची जबाबदारी, खेळाडूचे स्पर्धेतील प्रदर्शन-कामगिरी, उंचावलेला आलेख- फॉर्म, संघातील विशिष्ट जागा- त्याची उपयुक्तता, असल्यास अनुभव तसेच मेहनत या सर्व जमेच्या बाजूंचे मूल्यमापन होऊन प्रत्येक खेळाडूची निवड होते. हुशार सदस्य भौगोलिक परिस्थितीत हवामान-वातावरण, खेळपट्टया- प्रतिस्पर्धी, त्यांचे खेळाडू, त्यांच्या जमेची बाजू यांचाही अभ्यास करतात. व आपली मतं निर्भीडपणे मांडतात. या प्रक्रियेत केवळ मंडळाचा अध्यक्षच हस्तक्षेप करू शकतो. अन्य कुठलाही नाही. मंडळाच्या पाच जणांच्या निवड समितीत कोणत्याही एकास मंडळाकडून अध्यक्षपद- चेअरमेनपद- प्रमुख यापैकी कोणतेही एक पद दिले जाते. जे मानाचे असते.
कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर मतदान झाल्यास मतांची सम-विभागणी झाल्यास निर्णायक निर्णयासाठी कास्टींग वोट या सदराखाली अध्यक्ष आपल्या अधिकारानं या मताचा वापर करून विषयपूर्ती करू शकतो. या अध्यक्षास मंडळाच्या अध्यक्षाचा वरदहस्त असणे गरजेचे आहे. दुचाकीवर बसून दोघांनीही एक गीत गाणे शक्य होईल अशा प्रकाराचे नाते असल्यास दुग्धशर्करा योगच ठरेल. संपूर्ण पाच जणांची निवड समिती मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच खजिनदार यांच्या एकमेकांच्या विचारांचे देवाण-घेवाणीनंतर एकसूत्रता केली जाते. यात अनेक वेळा आहेत त्यांचा एक वगळताही त्यांच्या सेवा पुढे चालू ठेवण्यात येतात. सदस्य घेण्यास आज पात्रतेची आवश्यकता नाही.
भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचा अध्यक्ष हा क्रिकेटचा असावा अशी इच्छा सर्व स्तरावरील क्रिकेट खेळणारे आजी-माजी खेळाडूंचे असेल किंवा आहे. हा त्या खेळाडूचा बहुमान आहे. गलिच्छ- असंस्कृत मतांच्या राजकारणात हे शक्य होत नाही. ‘आवारा हूँ, या गर्दिश में हूँ... आसमान का तारा हूँ, आवारा हूँ’ हे आमचे समीकरण आहे. कर्ऩाटक राज्य क्रीडा संघटनेचा अध्यक्ष कसोटी क्रिकेटपटू अनिल कुंबळे झाला. या पदाचा त्याने स्वत:साठी काटेरी मुकूट करून घेतला. इंजिनिअर असूनही पूल-रस्ते-धरणे- भूयारी... दुसऱ्या प्रकारात वीजप्रवाहासोबत जोडली गेलेली उपकरणे, मोटारगाड्या-वाहने, औद्योगिक उत्पादन संचार यांपैकी कुणासही कर्नाटक क्रिकेटशी जोडता आले नाही. तेही कमिटीत दोन जवागल श्रीनाथ व व्यंकटेश प्रसाद सारखे भारताचे आणि कसोटी क्रिकेटपटू तसेच वेगवान गोलंदाज कमिटीत सोबत असताना भावी मंडळाचा अध्यक्ष म्हणून सर्व त्यांच्याकडे पाहत होते. शक्यही होते. आमचे खालच्याथरातील राजकारणी कोणती पातळी गाठू शकतात. गाठली पर्यायी यांच्या नावाचा लोप झाला. आणि कुंबळेची कशी हकालपट्टी करण्यात आली हे सत्य सर्वांनी अनुभवले. अशात या पदाची जागा कोण वागवेल का? आठवले ‘दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा’.
आमच्या मंडळाच्या प्रशासकीय गलथान कारभाराच्या आयपीएल संस्थापक, उद्योगपती, सिनेसृष्टीतील महिला असल्याची 33 ते 50 टक्क्यांची प्रतिनिधी प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी, शाहरुख खान तो सिनेसृष्टीतील आपली 25 वर्षांची भरीव कारकीर्द पूर्ण करत आहे... दुर्दैव असे की सक्तवसुली संचालनालयाने त्यांना आर्थिक चौकशीस पाचारण केली आहे. हे जरी असले तरीही सिनेसृष्टीत पदार्पण करू शकले. आर्थिक बळावर मंडळाच्या अध्यक्षपदाचा करंडक मिळू शकतो. दिल का भंवर करे पुकार क्रिकेट का राज सुनो रे... म्हणत षटकातील शेवटचा चेंडू अर्थात वाईड किंवा नोबॉल यांचा उल्लेख न झाळ्यास खेळ-खेळाडूला मन:शांती मिळू शकणार नाही.
लोकप्रतिनिधी राजकारणी थेट देशाच्या राजधानीपासून ते आर्थिक राजधानीपर्यंत येथे करोडोंच्या तिजोरींच्या चाव्या, उपयोग घेण्याच्या मतदारांनी दिलेला अधिकार, मनमानी कारभारास दिशांचे नसलेले बंधन, हम करे सो कायदा तुम मत पुछो इरादा... वायदा आणि कायदा असे चालणारे प्रशासन व चालविणाऱ्या प्रशासकांचा अध्यक्षसोबतचा गोतावळा.
आपली खासगी मालमत्ता असल्याचे धनवान व्यक्तीमुळे कुणासही अ काढण्याचे धाडस होणार नाही असा दरारा, मतदारांना खुश ठेवण्यासाठी- करण्यासाठी त्य़ांच्या मंडळाच्या प्रशासनातील भाग असलेल्या कमिट्यांमध्ये नियुक्ती हा कूटनीती डावपेच साधून मंडळाचे पुढे एशियन क्रिकेट कांउसिलातील अंतिम टप्प्यात आयसीसीचेही अध्यक्षपद पदरात पाडून घेऊन आखाती देशातील दुबई येथील त्यांच्या मुख्य कार्यालयातील खुर्ची पटाकावून, विराजमान होईपर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष केवळ स्वार्थ क्रिकेटच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले औदयोगिक-व्यवसायिक संपर्क संबंधीताशी आपण वैयक्तिक संबध जोडून आर्थिक लाभार्थी घेऊ शकतो.
कोणताही आंतरराष्ट्रीय खेळाडू याचे अनुकरण करेल का?
खेळ सज्जनांचा परंतु प्रशासन दुर्जनांचे परंतु यास लाभलेली सर्वसंमती कोण दूर करेल?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवडणुकीत अध्यक्षांचा होय महाराजा गोविंद मंडळ ग्रुप असतो. त्यात अध्यक्षांच्या खास मर्जीतले चमचे, डौले, झारे यांची निवड अनुक्रमे सचिव, खजीनदार व महत्त्वाच्या उपाध्यक्ष पदांसाठी करून त्यांचे अर्ज भरून हे पथक निवडणुकीत सामोरे जाऊन मताधिक्याने निवडून येवून संगीत खुर्चीचे पदानुसार मालकच होतात. नंतरचे धुमशान तुमच्या आमच्या नजरेत आहेत. परंतु म्हणतात... डम डम डीगा डीगा मौसम भीगा भीगा क्रिकेट के प्यार में मे तो गिरा हाय अल्ला सुभान्नला...
यानंतर केवळ क्रिकेट प्रशासक म्हणून व मंडळाचा पदाधिकारी या पदाचा लाभलेला बोनस सोबत मंडळाची प्रतिष्ठा नावलौकिक-वैभव-मानसन्मान सहीत सर्व सुख-सोयी सुविधांचे हे मानकरी ठरतात. अध्यक्षांना कशात रस आहे हे महत्त्वाचं. उदाहरणार्थ त्यांनी आय.सी.सी. वर आपले लक्ष केंद्रीत केले तर त्यांच्या या देशांच्या वा-या वारंवार होतचं राहणार यातूनच तर त्यांच्या या देशांच्या वाऱ्या वारंवार होतचं राहणार. यातूनच सुरू होणार स्वार्थाचा व्यापार व भागीदाऱ्यांवर उपकार. उदाहरणादाखल बांधकाम व्यवसायाचा विचार आपण केलात. सर्व आखातातील प्रांतात भागीदाऱ्यास कामे मिळवून देण्याची जबाबदारी अध्यक्षांचीच. क्रिकेटही सफलता देतेच. आज भागीदारी ऋणी आहे कारण प्राप्त झालेल्या संपत्तीमुळे त्याचे रेसचे घोडे रेसकोर्सवर धावत आहे.
वाचकहो, समजून घ्या या पुणेकराचे नाव आपल्यास शोधावयाचे आहे. माहितीच्या अधिकारात हे मिळणे आजही शक्य ऩाही. भारतीय म्हटल्यावर घटनेचा संदर्भ येतो. देणे बंधनकारक आहे. मंडळाच्या स्वतंत्र घटनेंतर्गत याचा आजतरी अंतर्भाव नाही. यांच्या कारभाराची माहिती सर्वसामान्याना उपलब्ध होऊ नये, याची दक्षता महाराजांनी यापूर्वीच घेऊन ठेवली आहे. पर्याय केवळ न्यायालय... आपण मात्र ‘डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका’ एवढेच म्हणणे योग्य.