'रन फॉर युनिटी पीस अँड सेफ्टी; चला आपण सर्व धावुया'
Max Maharashtra | 6 Jan 2019 9:31 PM IST
X
X
सध्या देशाचे वातावरण पाहता अनेक ठिकाणी एकात्मकता टिकून राहण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबिवले जात आहे. हीच राष्ट्रीय एकात्मकता टिकवण्यासाठी आज मालेगावकरांसाठी ग्रामीण पोलिसांनी मॅरेथॉन आयोजित केली होती. नाशिका ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे सो. यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील विविध धर्मियांमध्ये एकता, शांतता, सुरक्षितता व सामाजिक सलोख्यासाठी ग्रामीण पोलीस दलातर्फे आज दि. ०६ राष्ट्रीय एकात्मकता व जातीय सलोखा तसेच पोलीस व जनता संबंध आधिक वृद्धींगत व्हावे या साठी सदर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती.
पहाटे सकाळी ६ वा.पासूनच मॅरेथॉनला सुरुवात झाली होती. या स्पर्धेत शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, पोलीस व प्रशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मीडिया प्रतिनिधी व वार्ताहर समाजसेवक तसेच सर्व जाती-धर्मियांनी एकत्र येवून भरघोस प्रतिसाद दिला, अबालवृद्धांनीही सदर मॅरेथॉनमध्ये धावत राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. सदर मॅरेथॉनमध्ये ०३ किमी, ०५ किमी व १० किमी अंतराची दौंड आयोजित करण्यात आली, दरम्यान मालेगावकारंसह जिल्ह्यातील सुमारे १० हजार नागरिकांनी उत्सपुर्त प्रतिसाद नोंदविला.
मालेगाव शहरातील पोलीस कवायत एकात्मता चौक परिसरत ग्रामीण विकास मंत्री दादा भुसे, राज्याचे पोलीस अधीक्षक संजय दराडे सो यांच्या हस्ते ध्वज दाखवत मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंह करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. या मॅराथॉन मधून हिंदू-मुस्लीम धर्मियांनी एकत्र येवून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. अखंडता व सुरक्षा आबाधित राथण्यासाठी, तसेच एकात्मतेचा संदेश ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासठी 'रन फॉर युनिटी पीस अॅण्ड सेफ्टी चला आपण सर्व धावुया' असा संदेश देण्यात आला.दरम्यान पोलिसांनी ग्रामीण भागातील नागरिकांना हा सलोखा कायम ठेवावा असं म्हणत सर्वाचे आभार मानले
Updated : 6 Jan 2019 9:31 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire