अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या तारखेवरून प्रश्नचिन्ह
X
१६ ऑगस्टच्या दिवशीच अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले होते. परंतु शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की, वाजपेयी यांचे निधन १६ ऑगस्टच्या दिवशीच झाले होते की, या दिवशी त्यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली? पण साधारण १२-१३ ऑगस्टपासून त्यांचा श्वास मंद होऊ लागला.
स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक नको व लाल किल्ल्यावरील तिरंगा अर्ध्यावर उतरवायला नको आणि पंतप्रधानांचे सविस्तर भाषणही लाल किल्ल्यावरून व्हायचे होते. या विचाराने अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाची घोषणा १६ ऑगस्ट केली गेली.
दरम्यान, अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या तारखेवरून उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत संजय राऊत यांनी अद्यापपपर्यंत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. संजय राऊत यांनी 'सामना'मध्ये लिहिलेल्या लेखातून वाजपेयी यांच्या निधनाबाबत शंका उपस्थित केली आहे.