IPL 2023 Final : IPL चा थरार, अखेरच्या चेंडूपर्यंत टिकलेला सामना चेन्नईने जिंकला
गुजरात टायटन्स विरुध्द चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अटीतटीचा सामना रंगला होता. मात्र यामध्ये चेन्नईने पाच गडी राखून गुजरात टायटन्सवर विजय मिळवला.
X
CSK Vs GT : IPL 2023 च्या अंतिम सामन्याचा थरार अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) रंगला होता. या रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सला पराभवाची धूळ चारली.
गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) प्रथम फलंदाजी करताना 214 धावांचे लक्ष दिले होते. मात्र त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super kings) फलंदाजी करताना पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे DRS नियमानुसार चेन्नईला 15 षटकात 171 धावांचे लक्ष देण्यात आले होते. या लक्षाचा पाठलाग करताना चेन्नईचे पाच गडी बाद झाले.
चेन्नईचे फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने 16 चेंडूत 26 धावा, देवोन कॉन्वे (Devon Convey) याने 25 चेंडूत 47 धावा पटकावल्या. तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने 13 चेंडूत 27 धावा पटकावल्या. अंबाती रायडूने (Ambati Raydu) 8 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांसह 19 धावा पटकावल्या. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) शुन्यावर बाद झाल्याने चेन्नईच्या गोटात शांतता पसरली होती. मात्र शिवम दुबे (Shivam Dubey) याने नाबाद 21 चेंडूत 32 धावा आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने 6 चेंडूत एक चौकार आणि एक षटकारासह 15 धावा पटकावल्या.
साई सुदर्शनची एकाकी झूंज अपयशी
साई सुदर्शनने (Sai Sudarshan) 47 चेंडूत 96 धावा पटकावल्या होत्या. तर वृध्दीमान साहा (Vrudhiman Saha) यानेही 39 चेंडूत 54 धावा पटकावल्या होत्या. तर शुभमन गिलने (Shubhaman Gill) 20 चेंडूत 39 धावा पटकावल्या होत्या. त्यामुळे गुजरात टायटन्सने चेन्नईपुढे 215 धावांचे लक्ष ठेवले होते. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे चेन्नईला 15 षटकात 171 धावा करण्याचे लक्ष ठेवण्यात आले. यामध्ये चेन्नईने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत विजय साकारला.