भारतीय क्रिकेट मंडळ आणि रवी शास्त्री यांचा प्रशिक्षक पदासाठी पुनर्विवाह
Max Maharashtra | 8 July 2017 7:15 PM IST
X
X
''जिंंदगी एक सफर हैं सुहाना... यहाँ कल क्या हो किसने जाना'' हे गाणे गुणगुणत भारताचा प्रशिक्षक अनिल कुंबळे याने आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देवून स्वत:ला या जबाबदारीतून मुक्त करुन घेतले. इंग्लंडच्या हवामानाबाबत कोणत्याही क्षेत्रातील तज्ञ विशेषत: भाष्य करतांना आढऴणार नाही. किंबहूना धाडसही करणार नाही. यातूनही एक हवेची झुळुक आली आणि निकष होण्यापूर्वी आकाशवाणी झाली. कुंबळेला जीवदान लाभलेले आहे. ज्यांची निवड एकमताने केली ते सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि लक्ष्मण ही टेक्निकल सल्लागार कमिटी चँम्पिअन्स टॅॉफी दरम्यान इंग्लंडमध्येच कार्यरत होती. त्यांनी कुंबळेला या पदावरुन काढण्यास नकार दिलेला आहे. यांचा पुढील कार्यकाळ सुरु राहील. परंतू भारताचा सध्या गर्जना करणारा कर्णधार विराट कोहली याला त्याची तळपती बॅट, त्यातून निघणारा धावांचा ज्वालामुखीसमोर या मंडळाच्या नेमणुक केलेल्या सल्लागार समितीस घालीन लोटांगण करावे लागले. त्यांचे सिद्धांत-ध्येय धोरणांचे आराखडे यांचे विसर्जन स्वहस्ते खाडीतच करावे लागले. तुमचे आमचे नाही तर दिल्लीकर असलेल्या अफाट कोहलीचे अच्छे दिन आहेत. वृत्तपत्रे तसेच दुरचित्रनवाहिन्या तर त्याची ''तारिफ करु क्या उसकी जिसने तुम्हे बनाया'' अशी स्तुतीसुमने उधळीत आहेत. त्याचे मनमानी वागण्या करण्यास आणि स्वतंत्र प्रशासनास सर्व स्तरावरील परवाने उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
कोहली आणि रवी शास्त्री याने संघ संचालकाची भूमिका २०१४ ते २०१६ या दोन वर्षांच्या कालखंडात वठावलेली होती. तेव्हा या दोघांचा सूर ताल व लय “तुझ्या गळा माझ्या गळा गुंफु मोत्यांच्या माळा'' प्रमाणेच होता. आता तर त्याने शास्त्रीच्या नावाची मागणी केली आहे. परिस्थीती हतबल, कोणताही पर्याय शिल्लक ठेवलेला नाही. ’हम बने तुम बने इक दुजे के लिये’ याची धून लावून मंडळ कोहली समोर प्रशिक्षक माळ शास्त्रीच्या गळयात घालेल. मंडळाने शुभमुहुर्त काढुन दिवसही निश्चीत केलेला आहे. १९९० पासून इतर देशांचे अनुकरण करत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रशिक्षक पदाची नेमणूक करुन भारतीय संघास एक नजराणा भेट स्वरुपात दिला आणि राजधानी दिल्लीचा निशाण भेदीत हा काटेरी मुकुट चढवला. संघाच्या पराभवानंतर संघ समुद्रात बुडवावा असे विधान करुन स्वत:ची गच्छंती त्यांचे करुन घेतली.
यानंतर संदीप पाटील, मदनलाल अंशुमन गायकवाड, कपिल देव, अशोक मांकड यांनाही या पदाची संधी दिली गेली. कसोटी क्रिकेटपटु हा बेहतर प्रशिक्षक होवू शकत नाही हे यांनी केवळ सिध्द केले. आपल्या पेक्षा परदेशी गोऱ्यांना जास्त बुध्दीमता असते, त्यांना कळते आणि ते वळवूही शकतात. आपण संघटीत एकगीत एका मान्यवरासोबत राहू शकत नाही असा आपला सर्व संघातील पूर्व इतिहास आहे. यास कुंबळे-कोहली ही अपवाद नाही. म्हणूनच साधारण २००० पासून २०१५ पर्यंत मंडळाच्या क्रकेट विद्वानांची न्युझीलंडच्या ऑन टाईट ५ वर्षे, ऑस्टेलियाचा ग्रेग चॅपेल दोन वर्षे, दक्षिण आफ्रिकेचा गॅरी कस्टर्न ४ वर्षे नाटकातील शेवटचा चेंडू म्हणून २०११-१५ पर्यंतचा कालावधीसाठी झिंबाब्बेचा डेकन फेचर यांची नियुक्ती केली गेली. मंडळांचा मंडळींनी एककीत मानसशास्त्राचा अभ्यास केला असेल.
यातील दुर्देवाचा भाग म्हणजे वेस्ट इंडीडचा जगदविख्यात सर व्हिव्हीयन टिर्चर्डस याने कोहलीची विषेश तारीफ संधी निर्मिती करुन वेळोवेळी केली. ‘जब प्यार किसीसे होता है’ चे हावभाव केले. त्याच्यासाठी त्याच्याकडे प्रगतीचे विशेष आराखडे आहेत असा टाहो केला. परंतू त्याचा कोठेही विचार झाला नाही. हे सुर्देव का दुर्देव यांचे समर्पक उत्तर आजवर क्रिकेट रसिकांना प्राप्त झालेले नाही.
राजकारणी, चित्रपटसृष्टी व क्रिकेटचे खेळाडू हे मेटकूट आहे. २०१४ मध्ये देशाची राजनिती बदलली तशी क्रिकेटमध्येही मंडळाने संघ संचालक अशा गोंडस बाळास जन्म देवून त्याचे तात्पुरते बारसे करुन नामकरण केले. नावाप्रमाणे रविचा उदय झाला. शास्त्रीचे संघाबरोबर पोर्टोधत्य कार्य सुरु झाले. ते दोन वर्षे टिकले. शास्त्रींचा फिगर-फिगर मध्ये फरक प़डला.
आमच्या घटस्फोटात अनील कुंबळेची नियुक्ती जून २०१६ मध्ये झाली. उपलब्ध कालावधीत ५ मालिकांत त्याने आपल्या अनुभवाने-मार्गदर्शनाने विजय प्राप्तीसाठी हातभार लावला. याचा मोबदला साडेसहा करोड वरुन त्यास २ करोड हवे होते. दर्जा नको पण खेळाडुंना ५ करोड मानधन धावे असा सर्वांचा वकालनामा घेवून त्याने मधूर वाच्यता केली. याचे परिणाम काय याची पूर्वकल्पना अनुभव तो स्वत: कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष असताना पुन्हा धाडस करुन अपयशाची बुध्दी का व्हावी? ''एक धागा सुखाचा, शंभर धागे दुखाचे'' हे दाखवण्याची वेळ स्वत:वर आणतो. सध्याच्या भारतीय क्रिकेट मंडळास पारदर्शक कारभार हवा आहे. कायद्याचे तसेच वायद्याचे प्रशासन आज अस्तिस्वात आहे. अर्थात यांनाही योग्य त्या मार्गदर्शकाची नितांत गरज आहे. आरंभ कर. प्रशिक्षकाच्या ऐवजी मार्गदर्शक नावाचा उल्लेख वापर झाला तर खेळास न्याय मिळेल, भारताचे प्रतिनीधीत्व करताना कसोटीसाठी तयार आहेत असे ग़ृहीत धरले जाते. वय पाहता त्यांच्यात प्रशिक्षक कोणता मोठा बद्दल घडवू शकतो? अन्यथा ‘'ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, क्यां हुआ’ हे म्हणण्याची वेळ सर्वांवर येईल.
Updated : 8 July 2017 7:15 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire