Home > मॅक्स रिपोर्ट > 'जेजे'मध्ये पहिले कॅडेव्हरीक किडनी रोपण यशस्वी

'जेजे'मध्ये पहिले कॅडेव्हरीक किडनी रोपण यशस्वी

जेजेमध्ये पहिले कॅडेव्हरीक किडनी रोपण यशस्वी
X

मुंबई: सर जेजे रूग्णालयात दुसरे कॅडेव्हरीक अवयवदान व पहिले यशस्वी कॅडेव्हरीक किडनी रोपण पार पडले . जेजे रूग्णालयात आज ब्रेन डेड रूग्ण ताराबाई श्रावण पवार या ४५ वयाच्या महिलेचे अवयवदान करण्यात आले. ५ दिवसांपूर्वी त्यांच्या मेंदुचा रक्त पुरवठा अचानक थांबल्याने त्या बेशुद्ध झाल्या होत्या.२ सप्टेंबरला त्यांना बेशुद्ध अवस्थेत सर जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ४ सप्टेंबर रोजी त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यांचे पती श्रावण पवार जे कसाळे ता. कर्जत येथे कपड्यांना ईस्त्री करण्याचे काम करतात त्यांनी तसेच त्यांचा भाऊ श्री. अंकुश मोहिते व मुलगा गणेश यांनी त्यांचे अवयवदान करण्यासाठी संमती दिली.त्यानंतर अवयवदात्या ताराबाई पवार यांचे हृदय फोर्टीस रूग्णालयातील रूग्णास, लिव्हर अपोलो रूग्णालय नवी मुंबई येथील रूग्णास, एक किडनी ज्युुुपिटर रुग्णालयातील रूग्णास व दुसरी किडनी व दोन डोळे सर जेजे रूग्णालयात उपचार घेत असणाऱ्या रूग्णास रोपण करण्यात आले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि डॉ तात्याराव लहाने अवयवदात्या ताराबाईचे पती व कुटूंबातील सदस्यांचे सांत्वन केले.

ताराबाई पवार कसाळे गावात पण सामाजिक काम करत असत. त्यांनी चार रूग्णांना जीवदान व दोन रूग्णाना दृष्टीदान देऊन सामाजिक काम करण्याचा वसा मृत्यूनंतर ही कायम ठेवला. श्री.श्रावण पवार सारख्या अशिक्षीत व ईस्त्री करूण उदरनिर्वाह करणाऱ्या सामान्य माणसाने आपल्या पत्नीचे अवयवदान करूण समाजात मोठा आदर्श निर्माण केला आहे.अवयवदान करण्यासाठी डॉ तात्याराव लहाने अधिष्ठाता यांच्या नेतृत्वाखाली, अधिक्षक डाॅ. संजय सुरासे व सहकारी, डाॅ. अजय भंडारवार व टीम,डाॅ भरत शहा व सहकारी,किडनी रोपण करणारे डाॅ. व्यंकट गिते व डाॅ. गिता सेठ व सामाजसेवा अधिकक्षक राठोड, सावरकर व पाटील, डाॅ. ननंदकर, डाॅ. विद्या नागर, डाॅ. मधुकर गायकवाड, डाॅ. विकास मैंदाड तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने मोलाचे सहकार्य केले.

श्रावण पवार व कुटुंबीयांसी चर्चा करताना जे.जे.रूग्णालयाचे अधिष्ठाता रामेश्वर नाईक आणि संतोष आंधळे

नेहमी प्रमाणे रामेश्वर नाईक यांनी रात्रभर जागुन हे जेजे रुग्णालयातील दुसरे अवयवदान यशस्वी केले. यासाठी गिरीश महाजन हे स्वत: मार्गदर्शन करत होते. तसेच त्यांनी सर जेजे रूग्णालयात येऊन नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच महाजन यांनी सर जेजे रुग्णालयातील डाॅक्टर व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

Updated : 5 Sept 2017 7:38 PM IST
Next Story
Share it
Top