ग्रामीण वैद्यकीय सेवेतला नवा 'स्टार'
X
अद्ययावत वैद्यकीय सुविधा आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही उपलब्ध होऊ लागल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजमध्ये स्टार इमेजिंग डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून अद्ययावत सुविधा उपलब्ध झाली आहे. ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. नितीन करीर यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन पार पडले. ग्रामीण भागातील अद्ययावत सेवेने सुसज्ज असे हे भारतातील पहिलेच तंत्रज्ञानयुक्त डायग्नोस्टिक सेंटर असणार आहे..
माळशिरस तालुक्यातील पानीव येथील ़डॉ. सुनील पाटील यांनी हे डायग्नोस्टिक सेंटर सुरू केले आहे. जगातील सर्वात अद्ययावत आणि तंत्रज्ञानयुक्त असे 3 टी एम.आर.आय हे मशीन सुद्धा या सेंटरमध्ये उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे रेडिओलॉजीच्या विशेष कार्य करणाऱ्या १२ रेडिओलॉजिस्टची टीम या स्टार इमेजिंगचं वैशिष्ट्य आहे. या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये डायग्नोलॉजी, सोनोग्राफी, कलर डॉप्लर, पॅथॉलॉजी, आणि मेडिकल स्टोअर रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध आहे.
या नवीन डायग्नोस्टिक सेंटरमुळे मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरात रुग्णांना मिळणाऱ्या सेवा कमी खर्चात अकलूज येथे उपलब्ध होणार आहेत. तसेच परिसरातील रुग्णांना इंदापूर आणि पंढरपूर याठिकाणी उपचारासाठी जावं लागणार नाही. सध्या 3 टी एम.आर.आय हे जगातील सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान मुंबई आणि पुण्यानंतर अकलूज या शहरात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याचं डॉ. सुनील पाटील यांनी सांगितलं. या केंद्रात १२ रेडिओलॉजिस्ट आहेत जे ऑर्गन स्पेसिफिक रिपोर्टींग करतात . प्रत्येक रेडिओलॉजिस्ट शरिराच्या विशेष अवयवाचे रिपोर्टिंग करतात. याचा फायदा या परिसरातील रुग्णांना होणार आहे. जगातील सर्वात नवीन समजली जाणारी इनबोर टेक्नॉलॉजी देखील येथे उपलब्ध करून देण्यात आल्याने आता ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे.
MRI करताना भीती वाटते त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे चित्रपट, गाणी या MRI मशीनमध्ये दाखवले जाणार असल्याने रुग्णांना आता एम.आर.आयची भीती वाटणार नसल्याचे येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
https://youtu.be/zCcrjrqcNwI