Home > मॅक्स रिपोर्ट > परभणीत महिलेने केलेल्या शरीरसुखाच्या मागणीने तरुणाची आत्महत्या...

परभणीत महिलेने केलेल्या शरीरसुखाच्या मागणीने तरुणाची आत्महत्या...

परभणीत महिलेने केलेल्या शरीरसुखाच्या मागणीने तरुणाची आत्महत्या...
X

सध्या महिलांवर होणारे अत्याचार व त्याविषयीच्या अनेक बातम्या आपण वाचतो. पण परभणीत एक अजब घटना घडल्याचे समोर आले आहे. महिलेने शरीर सुखासाठी तगादा लावल्याने चक्क एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये महिलेने धमकी दिल्याचा उल्लेख केला आहे. मृत तरुणाचे नाव सचिन मिटकरी. हा तरुण परभणीतील वसमत रोड येथील दत्तधाम येथे राहणारा होता. याप्रकरणाची सविस्तर चौकशी सध्या सुरु आहे.

काय लिहिले होते सचिनने आपल्या सुसाईड नोटमध्ये-

‘त्या महिलेने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. माझे लग्न झाले आहे हे तिला माहित असूनही ती माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत होती. शरीरसंबंध ठेवले नाही तर बदनाम करण्याची धमकी ती महिला देत होती. त्या महिलेचे आणखी दोन तरुणांशी संबंध असून तिने माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला. याला कंटाळून आत्महत्या करत आहे’ असे त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

Updated : 15 Oct 2018 6:33 PM IST
Next Story
Share it
Top