Home > मॅक्स रिपोर्ट > लैंगिक शोषणाची तक्रार १० ते १५ वर्षांनीही करू शकता - मनेका गांधी

लैंगिक शोषणाची तक्रार १० ते १५ वर्षांनीही करू शकता - मनेका गांधी

लैंगिक शोषणाची तक्रार १० ते १५ वर्षांनीही करू शकता - मनेका गांधी
X

कधी काळी अन्याय करणार्‍यापेक्षा अन्याय सहन करणार हा जास्त दोषी असतो असे म्हणातत, मात्र काहीवेळी महिला सामाजिक राजकीय भीतीने त्यांच्यावर होणार्या अन्यायाबाबत बोलणे टाळते. जगभरात विविध मोठ्या पदावर काम करणार्या स्त्रियांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत मोठ्या हिमतीने वाचा फोडल्याचे दिसून येते. महिलांवर अत्याचार हे पूर्वापार चालत आलेत आणि अजूनही सुरु आहे, फक्त ते आता मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. कारण आज मोठ्या प्रमाणात महिला बोलू लागल्या आहेत. मग ती महिला कॉलेज तरुणी असो,गृहिणी असो, कॉर्पोरेट मध्ये काम करणारी असो किंवा चित्रपट सृष्टीत काम करणारी असो ती महिला धाडस करून, स्वतः वर झालेल्या अत्याचाराची साक्ष द्यायला पुढे येत आहे.

तनुश्री दत्ता, कंगना राणावत, रिचा चड्ढा या सारख्या अभिनेत्री जरी पुढे येऊन बोलत असल्या तरी केवळ सिनेसृष्टीतच हे प्रकार होतात असं नाहीये. प्रत्येक क्षेत्रातल्या महिलांना अशा प्रकारच्या गैर वर्तनाचा सामना करावा लागतोय. मध्यंतरी अभिनेता जितेंद्र याची गृहिणी असलेली चुलत बहीण हिने सुद्धा अभिनेता जितेंद्र कडून लहान असताना झालेल्या लैंगिक अत्याचाराची गोष्ट उघडकीस आणली आणि तक्रार दाखल केली होती.

आपल्यासोबत गैरकृत्य करणारी व्यक्ती आपल्याला लक्षात असते. त्यामुळे तक्रार करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. तुम्ही आता तुमच्या बाबतीत झालेल्या लैंगिक शोषणाची तक्रार १० ते १५ वर्षांनीही करू शकता. तसंच केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी लैंगिक शोषणाची तक्रार कधीही करता येते, असा खुलासा केला आहे. त्यांच्या या निर्णयाने १० वर्षांनी या महिलेला जाग आली का? इतकी वर्ष झोपलेली का? असं म्हणणाऱ्यांना चांगलीच चपराक मिळाली आहे. यासाठी आजच्या स्त्रीने या विषयीच्या कायद्याची माहिती करून घेणं महत्वाचं आहे.

काय आहेत महिलासंदर्भातील कायदे-

कलम ५०९ – विनयभंग – एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्याकडे पाहणे, बोलणे, शब्द उच्चारणे किंवा कृती करणे, एखादी वस्तू, गोष्ट दाखवणे, ती पाहण्यासाठी तिचे लक्ष वेधून घेणे किंवा तिच्या खाजागीपानाच्या अधिकाराचं उल्लंघन होईल असे वर्तन. या अपराधासाठी १ वर्ष सजा, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.

कलम २९४ – महिलेकडे पाहून सार्वजनिक ठिकाणी असभ्य किंवा अश्लील हातवारे करणे, अश्लील बोलणे किंवा गाणी म्हणणे. या अपराधाला ३ महिन्यांपर्यंत कैद, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.

कलम ३५४ – महिलेचा विनयभंग करण्यासाठी किंवा तशा हेतूने हल्ला करणे किंवा गुन्हेगारी ताकदीचा उपयोग करणे. या अपराधासाठी २ वर्षे कैद किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.

कलम ३५४ अ – हे कलम लैंगिक छळाचा विरोध करण्यासाठी घालण्यात आले आहे. छेडछाड आणि इतरही लैंगिक छळांच्या गुन्ह्यांसाठी हे कलम वापरता येतं.

Updated : 8 Oct 2018 8:24 PM IST
Next Story
Share it
Top