Home > मॅक्स रिपोर्ट > नयनतारा सहगल यांचं नाव रद्द करणे अशोभनीय – दीपा देशमुख

नयनतारा सहगल यांचं नाव रद्द करणे अशोभनीय – दीपा देशमुख

नयनतारा सहगल यांचं नाव रद्द करणे अशोभनीय – दीपा देशमुख
X

यवतमाळ इथे संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल येणार असं समजलं. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त करणारी, पुरोगामी विचारांची कास धरून चालणारी ही लेखिका नेहरू घराण्यात ली! केवळ जन्मानेच नव्हे तर वैचारिक वारसा जपणारी, तो पुढे नेणारी ही लेखिका! त्यांचं साहित्य संमेलनात होणारं (आता न होणार) भाषण त्यांच्या वैचारिक मूल्यांची साक्ष देत. त्यांना साहित्य संमेलनासाठी उद्घाटक म्हणून आमंत्रित करणं आणि नंतर रद्द करणं हे केवळ अशोभनीयच नव्हे तर अतिशय असंस्कृत प्रवृत्तीच लक्षण आहे. या सर्व कृतीचा एक लेखिका म्हणून मी तीव्र निषेध व्यक्त करते. असं लेखिका दीपा देशमुख यांनी म्हटलंय.

https://youtu.be/5mMIKxtPvvw

Updated : 8 Jan 2019 3:38 PM IST
Next Story
Share it
Top