#लॉकडाऊन यात्रा : कुस्तीचे आखाडे सुरू पण मल्लांचा खुराक बंद !
अनलॉक अंतर्गत अनेक उपक्रम सुरू झाले असले तरी गावोगावच्या यात्राही बंद आहेत. त्यामुळे यात्रांमध्ये भरणाऱ्या कुस्ती स्पर्धाही बंद आहेत. पण यामुळे पैलवानांना कोणत्या समस्या सहन कराव्या लागत आहेत ते दाखणारा रिपोर्ट....
X
लाल मातीतील रांगडा खेळ म्हणजे कुस्ती.. मात्र कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व लॉकडाऊन मुळे गेल्या आठ-नऊ महिन्यापासून कुस्ती मैदाने बंद असून मैदानावरती अवलंबून असणाऱ्या मल्लांचा गेला सिजन पूर्णपणे वाया गेला आहे... तर काही मल्लांनी खुराकविना कुस्ती सोडून दिली आहे... पण काही पैलवानांची कसरत सुरू होऊन नव्या जोमाने लाल मातीत उतरले असून शड्डूचा आवाज पुन्हा घुमू लागला आहे... परंतु हा शड्डू कुस्ती मैदानात कधी घुमणार या प्रतिक्षेत महाराष्ट्रातील मल्ल, वस्ताद व कुस्ती शौकीन आहेत.
महाराष्ट्रात अक्षय तृतीया व दत्त जयंतीपासून यात्रांचा सिजन सुरू होतो आणि यात्रेतील कुस्ती मैदानावर पैलवान मंडळींचा आर्थिक आधार अवलंबून असतो. गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले कुस्ती आखाडे दीर्घ प्रतीक्षेनंतर शासनाच्या नियमानुसार पुन्हा सुरू झाले आहेत. पण अजूनही महाराष्ट्रातील गावोगावी यात्रांमधून होणाऱ्य कुस्ती स्पर्धा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे तर अनेक मल्ल घरी बसून आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या कुस्ती स्पर्धा सुरू करण्याची मागणी मल्लांनी आणि स्पर्धा आयोजकांनी केली आहे.



