Home > मॅक्स रिपोर्ट > धारावी...ऐकावी...पाहावी अशीच

धारावी...ऐकावी...पाहावी अशीच

धारावी म्हटलं तर डोळ्यासमोर चटकनं एक चित्र उभं राहतं ते म्हणजे अवाढव्य, विस्तीर्ण पसरलेली झोपडपट्टी...चित्रपट, बातम्यांमधून दिसणारी धारावी कशी आहे, हे तिथल्या समस्या बातमीतून मांडण्यासाठी मी माझा सहकारी व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश भंडारेसोबत धारावीत गेलो. सर्वप्रकारच्या समस्यांची राजधानी म्हणूनही धारावीचा उल्लेख करता येईल. मुंबईच्या एकूण लोकसंख्येपैकी ४८.३ टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टीत राहते. त्यामुळं कमी-अधिक प्रमाणात तिथंही अशाच समस्या आहेत.

धारावी...ऐकावी...पाहावी अशीच
X

मुंबईच्या (Mumbai)अगदी मधोमध सुमारे ६०० एकर जमिनीवर धारावीची (Dharavi) झोपडपट्टी विस्तारलीय. सुमारे ६० हजारपेक्षा अधिक झोपड्यांमध्ये (Slum) अंदाजे १० लाखांपेक्षा अधिक नागरिक राहतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं १३ हजाराहून अधिक लघु उद्योग चालतात. इथल्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ७ नगरसेवक, एक आमदार आणि खासदार आहेत. मात्र, ते देखील समस्या सोडविण्यात हतबल असल्याचं दिसतं. धारावीच्या नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत. स्वच्छतेचा मुद्दा आहे. इथली गुन्हेगारी, नशेच्या आहारी गेलेली लोकं त्यांच्यापासून होणार त्रास अशा सर्व परिस्थिती सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तो इथल्या लोकांच्या पुनर्वसनाचा...

रिपोर्टिंग करत असताना माझे सहकारी कॅमेरा मॅन संदेश आणि मी या वॉर्ड क्रमांक 185 मध्ये गेलो. झोपडपट्टीची सुरवात होते तिथे कचऱ्याचे डिगारे तर दिसतात. परंतु हे साफ करण प्रशासनाची जबाबदारी आहे. तशीच तिथे राहणाऱ्या नागरिकांची देखील आहे. त्यांनी कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थीत केली कचऱ्याचा डब्ब्यातच कचरा टाकला तर त्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागणार नाही ही जबाबदारी स्थानिकांची आहे.

रिपोर्टिंग करत असताना कोणीही कॅमेरा समोर येऊन बोलत नाही. परंतु ज्यावेळी कॅमेरा बंद होतो त्यावेळी मग समस्या मांडतात. विविध भाषिक लोकं या ठिकाणी पाहिले. आम्ही सुरुवात करतानाच 10 ते 15 जणांच्या घोळक्यात घुसलो. त्या मुलांशी चर्चेला सुरुवात केली. त्यांना मी सांगितलं मॅक्स महाराष्ट्र मधून आलोय, तुमच्या विभागातील समस्या काय आहेत यावर बोलू शकाल का ? तर त्यावर बोलायला कोणीच तयार होत नव्हतं. परंतु ते त्यांच्या त्यांच्या भाषेत चर्चा करत होते. लोकप्रतिनिधी तुला टार्गेट करतील अशी काहीशी कुजबूज सुरू होती. पंरतु तो ही मुलगा बीएमएम (पत्रकारिते) चा विद्यार्थी होता. त्याने धाडस करत बोलु लागला तो बोलत असताना दोन्ही बाजू संभाळून बोलत असल्याच जाणवल. त्यांनी सांगितलं की साफसफाई होते. परंतु लोकचं याठिकाणी घाण करत असतात. याविभागातील नगरसेवक प्रत्येकाच्या संपर्कात असतात. कोणाला काही गरज लागली तर ते स्वतः त्या ठिकाणी जाऊन करून घेतात.




त्यानंतर आम्ही पुढे सरकलो गल्ली गल्लीत आमची धारावी यात्रा पुढे सरकवली. वॉर्ड क्रमांक 185 मधल्या दुसऱ्या गल्ली घुसल्यानंतर तेथील अनेकाशी संवाद केला. त्यांच्या समस्या जाणण्यासाठी त्यांची विचारणा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले, आमच्या इथे सध्यातरी कोणता असा प्रॉब्लेम नाही. आमचे माजी नगरसेवक टीएम जगदीश हे इथल्या सर्व नागरिकांच्या संपर्कात आहेत. कोणाच्या काही समस्या जरी असल्या तरी ते सोडवत असतात. काही क्षणासाठी गल्लीतील स्वच्छता तिथे लावण्यात आलेल्या एलईडी लाईट सर्व पाहून आनंद झाला. प्रत्येक वॉर्डमध्ये असाच एक नगरसेवक असावा, असं वाटलं.

पुढे एका नगरातील भाई सोबत भेट झाली. दिवसाढवळ्या चपटी मारत रस्त्यावर फिरत होता. तुम्ही काय करता इकडे असा मलाच त्याने प्रश्न केला. कुठून आलात ? मी सांगितलं धारावीत रिपोर्टीगसाठी आलो आहे. तुम्ही काय करता असा सवाल केल्यानं त्यांनी सांगितलं मी सोशल वर्कर आहे. याविभागात बरीच काम केली आहेत. भाईगिरीच्या भाषेत आणि दारुच्या नशेत एकच शब्द 4 वेळा बोलत होता. म्हणत होता तुम्ही मला ओळखत नाही. किरीट सोमयांशी माझी ओळख आहे. या शेबंड्या पोरांना काय विचारतो, माझ्याशी बोल मी दारु प्यायलो असलो तरी तुला सर्व सांगेन पण तुम्ही ही बातमी लावणार का ? तो पुढे म्हणाला इथली मुलं खुप डेंजर आहे. तुला घोळका करुन मारतील असं म्हणून माझ्या आयकार्डचा फोटो काढुन घेतला. थोडीशी भीती मनात तयार झाली. त्याला गोष्टी समजावता समजावता 1 तास फुकट गेला आणि मग मी सावधगिरीने राहू लागलो. सोबत संदेश होताचं माझ्या त्यामुळे मी ही डेअरींग करत होतो.




तसंच आमचं मिशन अजून काही गल्लीत फिरवलं असता आम्हाला नजरेस लाइव्ह विजवल दिसायला लागले. आम्ही तेथील एका वयस्कर व्यक्तीला विचारलं की,” तुमच्या भागात काय समस्या आहेत. त्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली. कचरे का समस्या है, नाली साफ नही होती है. इसलिए कचरा पुरा उपर आता है पुरी गंदगी फैलती है. एैसी हालत रहेगी तो आपून बीमारी को आमंत्रित कर रहे है. बारीश मे और दिक्कत होगी. पहले अच्छी थी. जबसे सरकार चेंज हूई है, तभी से काम नही हो रही है. सरकार बदलल्याने कामावर परिणार होत आहे. वार्डामध्ये माजी नगरसेवक लक्ष देतात. पण सध्या त्यांच्या हातात काय नाही सर्व प्रशासानाकडे त्यामुळे मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai mahanagarpalika) त्याकडे लक्ष देत नाही.

सर्व काम करत असताना परतीच्या प्रवासाला रात्र झाली येता येता शेवटच्या एक व्यक्तीसोबत बोलायच ठरवलं बाईक वर बसलेला त्याव्यक्ती बरोबर बोलण्याची सुरुवात केली असता तो म्हणाला चला तुम्हाला मैदानात नेतो. अनेक मुलं त्या ठिकाणी खुले आम ड्रग्स, गांजाची नशा करत असतात. रात्रीची वेळ होती. आमच्याकडे स्टिंग ऑपरेशनचा कॅमेरा ही नव्हता. रात्रीची वेळ त्यात धारावी सारख्या एरीयात रिस्क घेण बरोरबर नाही, त्यामुळे आम्ही डेअरीग केली नाही. परंतु मला एका गोष्टीचा आजही उलगडा होत नाही. झोपडपट्टीतील मुलांनाच या व्यसनाधीनतेमध्ये का अडकवल जात मुंबई पोलिसांचे आमली पदार्थ मुक्त मोहीम राबवली त्यात त्यांना मुंबईतले स्लम भाग दिसत नाही का? परवा रमाबाई नगरात ही हीच परिस्थीती दिसून आली.



Updated : 28 Jun 2023 1:48 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top