Home > मॅक्स रिपोर्ट > महिला दिन : महिला शक्तीचा आयवुमन ग्लोबल अवॉर्ड देऊन सन्मान होणार

महिला दिन : महिला शक्तीचा आयवुमन ग्लोबल अवॉर्ड देऊन सन्मान होणार

महिला दिन : महिला शक्तीचा आयवुमन ग्लोबल अवॉर्ड देऊन सन्मान होणार
X

वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी आयवुमन ग्लोबल अवॉर्ड दिला जातो. यावर्षी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन पुण्यात कऱण्यात आलं आहे.

महिला सशक्तीकरणासाठी आयवुमन ग्लोबल अवॉर्ड ही संस्था कार्यरत आहे. कला, क्रीडा, पर्यावरण, विज्ञान आणि नवकल्पना, उद्योग, सामाजिक कार्य अशा विविध कॅटेगिरीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना आयवुमन ग्लोबल अवॉर्डनं सन्मानित केलं जातं. याशिवाय वुमन आयकॉन, ज्युरी असे पुरस्कारही दिले जातात.

२०१९ च्या आयवुमन ग्लोबल अवॉर्डच्या पुरस्कार्थी अंकिता बाजपेयी,अनुराधा ठाकूर,चंद्रो तोमर,ध्यानी दवे , मंदाकिनी आमटे , डॉ. लक्ष्मी गौतम ,किरण सेठी, इंदिरा दांगी,डॉ मेधा ताडपत्रीकर,नैना पारेख,डॉ. पल्लवी तिवारी,प्रकाशी तोमर, सुप्रीती मिश्रा,रुमादेवी, रितू बियाणी, डॉ. राधिके खन्ना इ

अंकिता बाजपेयी

विजेत्या

आय वुमन ग्लोबल अवॉर्ड

यावर्षीचा कला (Art) श्रेणीमधील आय वुमन ग्लोबल अवॉर्ड अंकिता बाजपेयी यांना जाहीर झाला आहे. या जगामध्ये महिला फार काही करू शकत नाही, या विचारधारेला तडा देऊन अंकिता बाजपेयी यांनी लखनऊमधून कठीण परिश्रम करून कथ्थक नृत्याचे जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहे. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांच्या नावे अनेक अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची नोंद झाली आहे.

अनुराधा ठाकूर

विजेत्या

आय वुमन ग्लोबल अवॉर्ड

आयडब्ल्यूजीएला यावर्षीचा कला श्रेणीतला पुरस्कार अनुराधा ठाकूर यांना देतांना अभिमान वाटतोय , जगभरातल्या प्रदर्शनांमध्ये ज्यांनी काढलेल्या चित्रांचा समावेश आहे, महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या १०० सशक्त महिलांमध्ये स्थान मिळवणारी, पंतप्रधान कार्यालयातील भिंतींची शोभा वाढवणारी चित्रं काढणारी, हैदराबादच्या बीट्स पिलानी कॅम्पसमध्ये TEDx मध्ये भाषण करणाऱ्या अनेक पुरस्कारांनी नावाजलेल्या चित्रकार अनुराधा यांना यावर्षीचा आय वुमन ग्लोबल अवॉर्ड जाहीर झाला आहे.

चंद्रो तोमर

विजेत्या

आय वुमन ग्लोबल अवॉर्ड

आयडब्ल्यूजीएला यावर्षीचा स्पोर्ट्स श्रेणीतला पुरस्कार चंद्रो तोमर यांना जाहीर झाला आहे. ८६ वर्षाच्या या अष्टपैलू उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यामध्ये जोहरी गावातील आहेत. त्यांना गावामध्ये "शूटर दडी" आणि "रिव्हॉल्वर दडी" अश्या नावाने ओळखले जातात. त्यांनी अनके मुलींना नेमबाजी शिकवली ते एक कुशल नेमबाज आणि मार्गदर्शक म्हणून त्यांची राष्ट्रीय ख्याती आहे. आपल्या कुटुंबातील आणि समाजातील सर्व मुलींना नेमबाजी यावी यासाठी त्या प्रयत्न करत आहे.

ध्यानी दवे

विजेत्या

आय वुमन ग्लोबल अवॉर्ड

IWGA यावर्षीचा स्पोर्ट्स श्रेणीतला पुरस्कार ध्यानी दवे यांना जाहीर झाला आहे. ध्यानी दवे या बुद्धिबळ य़ा खेळातील गुजरातच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मास्टर आहेत. वयाच्या ६ व्या वर्षांपासून त्यांनी बुद्धिबळ खेळायला सुरवात केली, त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलं नाही. सात वर्षांच्या असतांना त्यांनी स्टेट चॅम्पियनचा किताब पटकावला. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी पहिलं आंतरराष्ट्रीय पदक जिकंले. त्यांनी एकूण 40 आंतरराष्ट्रीय स्पर्धा, 32 राष्ट्रीय चॅम्पियनशिप आणि 56 राज्य चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना अनेकदा सन्मानित करण्यात आले.

मंदाकिनी आमटे

विजेत्या

आय वुमन ग्लोबल अवॉर्ड

IWGA चा यावर्षीचा परिक्षकांचा जीवनगौरव पुरस्कार मंदाकिनी आमटे यांना जाहीर झाला आहे. त्या वैद्यकीय क्षेत्रातील निष्णांत डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना डॉ. प्रकाश आमटें सोबत 2008 मध्ये 'कम्युनिटी लीडरशिप' हा पुरस्कार देण्यात आला होता. 1973 साली प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या महारोगी सेवा समितीचा कार्यभार पुढे मंदाकिनी यांनी सुरू ठेवलाय. डॉ मंदाकिनी आमटे या आदिवासी स्त्रियांच्या आरोग्यासंदर्भात कार्यरत आहेत.

डॉ. लक्ष्मी गौतम

विजेत्या

आय वुमन ग्लोबल अवॉर्ड

IWGA चा यावर्षीचा वुमन आयकॉन पुरस्कार डॉ. लक्ष्मी गौतम यांना जाहीर झाला आहे. त्या कनक धारा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. आपल्या संस्थेमार्फत गरजू लोकांना नेहमी मदत करत असतात. समाजामध्ये शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणास मदत करणे, महिलांच्या सुरक्षतेबद्दल आवाज उठवणे अशा अनेक मुद्द्यांवर त्या काम करतात. याआधी महिला विकास मंत्रालयाच्या नारी शक्ती पुरस्काराने डॉ. लक्ष्मी यांना सन्मानित करण्यात आले आहे.

किरण सेठी

विजेत्या

आय वुमन ग्लोबल अवॉर्ड

IWGA चा यावर्षीचा विशेष उल्लेखनीय ज्यूरी पुरस्कार किरण सेठी यांना जाहीर झाला आहे. नवी दिल्ल्ली येथे जन्मलेल्या, किरण यांनी लहानपणापासून श्री शिवकुमार कोहली यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरक्षणाचं प्रशिक्षण सुरू केले होतं. 1987 मध्ये त्या दिल्ली पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून दाखल झाल्या. सध्या त्या उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी महिलांना स्वरक्षणाचं प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली आहे. त्याचबरोबर त्यांनी 1989 मध्ये दिल्ली पोलिसांनी आयोजित केलेल्या स्वयं-संरक्षण शिबिरात 1800 मुलांना प्रशिक्षण दिले. याशिवाय त्या अपंग मुलांसाठीही विविध कार्यक्रम घेत असतात.

इंदिरा दांगी

विजेत्या

आय वुमन ग्लोबल अवॉर्ड

IWGA चा यावर्षीचा विशेष उल्लेखनीय पुरस्कार विजेते इंदिरा दांगी यांना जाहीर झाला आहे. इंदिरा दांगी या एक हिंदी लघु कथालेखक असून नावाजलेल्या नाटककारही आहेत. इंदिरा यांना हवेली सनातनपूर या पुस्तकासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. इंदिरा दांगी यांच्या अनेक कथा नेपाळ, भूतान, तिबेट आणि पाकिस्तानसारख्या देशात प्रसिद्ध आहेत. हिंदी साहित्यातील प्रसिद्ध परिक्षक नामवर सिंह इंदिरा यांच्याबद्दल म्हणाले होते की, ‘’इंदिरा या हिंदुस्थान की अवाम की नई आवाज’’ आहेत.

डॉ मेधा ताडपत्रीकर

विजेत्या

आय वुमन ग्लोबल अवॉर्ड

IWGA यावर्षीचा पर्यावरण श्रेणीतील पुरस्कार डॉ. मेधा ताडपत्रीकर यांना जाहीर झाला आहे. त्या जनरल इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लि. आणि रुद्र एनवायरमेंटल सोल्यूशन्स (इंडिया) लिमिटेड आणि केशव सीता मेमोरियल फाऊंडेशन ट्रस्टच्या विश्वस्त आहेत. त्याचबरोबर मंत्र रिसर्च अँड कन्सल्टंट्स प्रा. लि. च्या संचालक आहेत. लहानपणापासून मेधा या पर्यावरणबाबत जागरूक होत्या. लहान वयातच मेधा यांना प्लॅस्टिकमुळं एका हरिणाचा मृत्यु झाल्याची बातमी समजली आणि त्या वेगानं त्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या कामाला सुरूवात केली. यातूनच त्यांनी २०१० मध्ये टाकाऊ प्लॅस्टिकपासून इंधन तयार करणारं यंत्र विकसीत केलं. सध्या पुण्यात रूद्र कंपनीचे दोन प्रकल्प सुरू आहेत.

नैना पारेख

विजेत्या

आय वुमन ग्लोबल अवॉर्ड

IWGA चा यावर्षीचा विशेष ज्युरी पुरस्कार नैना पारेख यांना जाहीर झाला आहे. मानसशास्त्रात पदवीधर असलेल्या नैना यांनी मारानगोनी, मिलान आणि लंडन बिझनेस स्कूलमधूनही शिक्षण घेतलेलं आहे. डिझाईन आणि निर्मिती या क्षेत्रात नैना यांचं भरीव योगदान आहे. अवेकन द मॅजिक – रिअल स्टोरीज् ऑफ लव्ह, होप अँड इन्सपिरेशन या पुस्तकातून त्यांनी महिलांचं विश्व मांडलं आहे. या पुस्तकाचं प्रकाशन माजी उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांच्याहस्ते झालं आहे.

डॉ. पल्लवी तिवारी

विजेत्या

आय वुमन ग्लोबल अवॉर्ड

IWGA चा यावर्षीचा 'विज्ञान आणि नवकल्पना' श्रेणीतील पुरस्कार डॉ. पल्लवी तिवारी यांना जाहीर झाला आहे. डॉ. पल्लवी या बायोमेडिकल इंजिनियरिंग, स्कूल ऑफ मेडिसिन आणि केस स्कूल ऑफ इंजिनियरिंग या संस्थांमध्ये त्या सहायक प्राध्यापक आहेत. Molecular Oncology Program या कार्यक्रमाच्या त्या सदस्य आहेत. आपल्या शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी आणि यशासाठी, डॉ. पल्लवी यांना विविध आंतरराष्ट्रीय संस्थांनी सन्मानित केले आहे. भारत सरकारने '100 महिला अचिव्हर्स अवॉर्ड 2015', 'इनोवेशन अवॉर्ड 2014 केस वेस्टर्न रिजर्व युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनियरिंग' अशाप्रकारच्या पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

प्रकाशी तोमर

विजेत्या

आय वुमन ग्लोबल अवॉर्ड

IWGA चा यावर्षीचा क्रीडा श्रेणीतील पुरस्कार 60 वर्षांच्या प्रकाशी तोमर यांना जाहीर झाला आहे. ज्या वयात लोकं निवृत्त होतात, त्यावेळी प्रकाशी यांनी हातात पिस्तुल घेतलं. आपल्या मुलींचं आणि नातींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी हातात पिस्तुल घेतलं होतं. त्यांच्या जिल्हा हा स्त्रीभ्रूणहत्या आणि ऑनर किलिंगच्या घटनांमुळं बदनाम झाला होता. आज प्रकाशी या स्वतःच्या गावातील 40 आंतरराष्ट्रीय नेमबाजांसाठी आदर्श ठरलेल्या आहेत.

सुप्रीती मिश्रा

विजेत्या

आय वुमन ग्लोबल अवॉर्ड

IWGA चा यावर्षीचा उद्योजक श्रेणीतील पुरस्कार सुप्रीती मिश्रा यांना जाहीर झाला आहे. महिला उद्योजक म्हणून विविध ५ कंपन्या त्यांनी हाताळल्या आहेत. त्या ओदिशातील एकमेव एलपीजी सिलेंडर आणि नियामक कंपनीच्या संचालक आहेत. ओदिशातील दुर्लक्षित रिसॉर्टवर त्यांनी काम केले.

रुमादेवी

विजेत्या

आय वुमन ग्लोबल अवॉर्ड

IWGA चा यावर्षीचा सामाजिक कार्य श्रेणीतील पुरस्कार रुमा देवी यांना जाहीर झाला आहे. सामाजिक परिवर्तनासाठी रूमादेवींनी स्वतःला झोकून दिलं आहे. रूमादेवींनी ‘दीप दवल’ नावाचा स्वंय सहायता गट अत्यंत कमी भांडवलामध्ये सुरू केला. रूमादेवींनी शिलाई मशीन घेऊन कपडे शिवायला सुरूवात केली. २००८ मध्ये त्या जीव्हीसीएस या संस्थेच्या सदस्या झाल्या. त्यातून त्यांनी महिलांच्या उत्थानासाठी कामं करायला सुरूवात केली. त्यांच्या या कामाची दखल घेत त्या पुढे जीव्हीसीएसच्या अध्यक्ष निवडल्या गेल्या.

रितू बियाणी

विजेत्या

आय वुमन ग्लोबल अवॉर्ड

IWGA चा यावर्षीचा विशेष उल्लेखनीय ज्यूरी पुरस्कार कॅप्टन डॉ. रितू बियाणी यांना जाहीर झाला आहे. रितू या पहिल्या लेडी पॅराट्रूपर, माउंटनियर आणि स्कायडायव्हर आहेत. त्यांनी भारतीय सैन्य दलात डेन्टल कॉर्प्समध्ये 10 वर्षे काम केले आहे. माहेश्वरी मारवाडी समुदाय आणि गुजरातमधल्या त्या पहिल्या महिला आहेत ज्या भारतीय सैन्यात सामील झाल्या होत्या. त्यांनी महिलांना होणाऱ्या स्तनाच्या कर्करोगासंदर्भात काम करणाऱ्या 'वॉरियर्स' या मोहीमेला सुरूवात केली. डॉ. बियाणी यांच्या कामाची तीन वेळा भारतातील लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड (2007, 2008 आणि 2014) ने नोंद घेतली आहे.

डॉ. राधिके खन्ना

विजेत्या

आय वुमन ग्लोबल अवॉर्ड

जनहितैषी, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक पातळ्यांवर काम करत आहेत. याशिवाय त्या कुठलंही काम तडीसं नेणाऱ्या म्हणून परिचित आहेत. याशिवाय आर्ट ऑफ लिविंगच्या त्या शिक्षिकाही आहेत. गेल्या ३३ वर्षांपासून त्या गरजूंना विविध माध्यमातून मदत करत आहेत. सक्षमीकरणासाठी डॉ. खन्ना या अनेक परंपरांना छेद दिला आहे. अपंग, गतिमंद मुलांच्या शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसनासाठी त्या अहोरात्र मेहनत घेत आहेत.

Updated : 7 March 2019 8:51 PM IST
Next Story
Share it
Top