Home > मॅक्स रिपोर्ट > निवडणूकांमध्ये महिलांनी सतत सहभाग घ्यावा - दिवंगत मीरा सान्याल

निवडणूकांमध्ये महिलांनी सतत सहभाग घ्यावा - दिवंगत मीरा सान्याल

निवडणूकांमध्ये महिलांनी सतत सहभाग घ्यावा - दिवंगत मीरा सान्याल
X

मीरा अतिशय सामान्य वाटणार नाव मात्र कोणालाही लाजवेल अशी निर्णय क्षमता असलेल्या मीरा सान्याल. जगभरात गुणवत्तेसाठी ओळखल्या जाणा-या हार्वर्ड विद्यापीठाच्या त्या पदवीधर होत्या. रॉयल बॅंक ऑफ स्कॉटलॅंड च्या त्या भारतातील अध्यक्ष तरीही बॅंकेतली आलिशान नोकरी सोडून त्या आल्या कारण तिला बदल हवा होता. हा बदल केवळ दोष देऊन नको होता. तो बदल आपण करु शकतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता.२००८ ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा सर्व भारतीय हादरले दुःखी झाले मात्र भ्रष्टाचार, दहशतवाद हे संपवायचं असेल तर निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावं लागेल, हे त्यांनी ओळखल त्यासाठी निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हायचं तर राजकारण अपरिहार्य आहे, म्हणून मग त्या २००९ च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभी राहिल्या. २०१४ ला आम आदमी पार्टी कडून निवडणूक लढवली ती निवडणूक त्या जिंकू शकल्या नाही. मात्र काही बदल घडवायचा असेल तर मसिहाची वाट न बघता स्वतः त्यात झोकून दिलं पाहिजे ही शिकवण मीरा सान्याल यांनी दिली. महिलांनी निवडणूक प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवणव हे किती आवश्यक आहे हे सान्याल सतत सांगत. त्यांचा लढा त्यांनी शेवटपर्यंत लढला आणि अखेर कॅन्सरने मात्र त्यांचा घात केला. तरीही त्या हरल्या नाहीत. त्यांचा लढा आपल्याला सतत प्रेरणा देत राहिल.

Updated : 12 Jan 2019 8:21 PM IST
Next Story
Share it
Top