Home > मॅक्स रिपोर्ट > दारूबंदीसाठी धावल्या गडचिरोलीतील रणरागिणी

दारूबंदीसाठी धावल्या गडचिरोलीतील रणरागिणी

या महिलांनी केले असे काही काम पाहून आपल्यालाही अभिमान वाटेल...

दारूबंदीसाठी धावल्या गडचिरोलीतील रणरागिणी
X

महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्यानंतर त्यावरून मोठे वादंग निर्माण झाले होते. त्यातच चंद्रपुरसह गडचिरोली जिल्ह्यातही दारूबंदीची मागणी जोर धरू लागली आहे. त्यापार्श्वभुमीवर मुक्तिपथ या अभियानाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात महिलांसाठी दारूबंदीविरोधात मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये दारूबंदीसाठी अनेक महिला धावल्याचे दिसून आले.





गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली आहे. मात्र ही दारुबंदी कागदावर आहे. त्यामुळे दारुबंदी प्रत्यक्षात आणण्यासाठी मुक्तिपथ हे अभियान सुरू करण्यात आले. याबरोबरच या अभियानाच्या माध्यमातून गावसंघटना तयार करण्यात आल्या. या संघटनांच्या माध्यमातून दारुविक्रेत्यांवर धाक निर्माण करण्यासाठी स्रियांची संघटना मजबूत व्हावी आणि कार्यकर्त्यांची प्रेरणा टिकून रहावी, यासाठी मुक्तिपथाच्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात दुर्गम भागातील महिला सहभागी झाल्याची माहिती मुक्तिपथ अभियानाचे कार्यकर्ते अक्षय पेद्दिवार यांनी सांगितले.




मुक्तिपथ अभियानाच्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलेने सांगितले की, माझ्या नवऱ्याची, मुलाची दारु सोडवण्यासाठी आणि गावातील दारुबंदी करण्यासाठी 70 कोस (210 किमी) धावण्याची तयारी आहे. याबरोबरच शासनाचा सहभाग आणि लोकांचा पुढाकार यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील दारू आटोक्यात येत आहे. त्यामुळे मुक्तिपथ संस्थेचा प्रयोग पथदर्शी ठरणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.


Woman Ran for prohibition of liquire from Gadchiroli

Updated : 1 Oct 2022 6:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top