Home > मॅक्स रिपोर्ट > रक्ताने माखलेले पॅड घालून मंदिरात जाल का? स्मृती इराणींचा उलटा सवाल

रक्ताने माखलेले पॅड घालून मंदिरात जाल का? स्मृती इराणींचा उलटा सवाल

रक्ताने माखलेले पॅड घालून मंदिरात जाल का? स्मृती इराणींचा उलटा सवाल
X

शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी "रक्ताने माखलेले पॅड घेऊन मित्रांच्या घरी जात नाही मग देवाच्या मंदिरात जाल का," असा प्रतिप्रश्न करून नवीन वाद ओढवून घेतला आहे.

"मंदिरात जाणं आणि प्रार्थना करणं हा सर्वांचाच अधिकार असला तरी मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही मंदिरात कशा काय जाऊ शकाल?" असा प्रश्न उपस्थित करत सर्वांना धक्काच दिला आहे. देशभर महिलांना समान हक्क आणि अधिकार मिळावेत यासाठी चळवळी सुरू झालेल्या असताना महिला म्हणून होत असलेल्या भेदभावासंदर्भात स्मृती इराणी यांच्या या वादग्रस्त विधानांमुळे महिला चळवळींमध्ये अस्वस्थता आहे.

मलाही भेदभावाचा सामना करावा लागला-

"मी हिंदू आहे आणि माझा नवरा पारशी, त्यामुळे पारसी अग्यारीत मला प्रवेश नाकारण्यात आला. आज ही मी माझा नवरा अग्यारीत जातो त्यावेळी कार मध्ये बाहेर बसून राहते" असं स्मृती इराणी यांनी सांगीतलं. ब्रिटीश डेप्युटी हायकमिशन आणि ऑब्जर्व्हर रिसर्च फाऊंडेशन यांच्यातर्फे आयोजित परिसंवादात त्या बोलत होत्या.

Updated : 23 Oct 2018 5:13 PM IST
Next Story
Share it
Top