गोदी मीडियावर आर्यनची चर्चा पण अदानी पोर्टवरील ३ हजार किलो ड्रग्जकडे दुर्लक्ष
आर्यन खानला ड्रग्जप्रकरणी अटक झाल्यानंतर गोदी मीडियाच्या स्क्रीनवर अनेक सवाल उपस्थित केले गेले. पण हे ड्रग्ज भारतात येते कुठून असा प्रश्न त्यांना मोदी सरकारला विचारावासा वाटत नाही. मुंद्रा अदानी पोर्टवर सापडलेल्या ३ हजार किलो ड्रग्जबाबत गोदी मीडिया गप्प का, याचा शोध घेणार रिपोर्ट....
X
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्जप्रकरणी अटक झाल्याची ब्रेकिंग न्यूज चालवणाऱ्या मोगी मीडियाला मुंद्रा अदानी पोर्टवर सापडलेल्या ३ हजार किलो ड्रग्ज प्रकरण गंभीर वाटत नाही का, या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता येतील का? असा प्रश्न आहे. आर्यन खान कुणाचाही मुलगा असला तरी त्याने बेकायदेशीर काम केले असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे...पण मुळात देशात ड्रग्ज येते कुठून यावर चर्चा का होत नाही, ड्रग्जची तस्करी रोखण्यात सरकार कमी पडतंय का असा सवाल गोदी मीडिया का विचारत नाहीत? नेमका हाच प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.
काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी सांगितले आहे की, आर्यन खानवर कारवाई झाली पाहिजे पण देशात बाहेरुन ड्रग्ज येत आहे, याबद्दल सरकार काय करतं आहे. देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित नाहीत का, असा सवालही त्यांनी विचारला आहे. एवढेच नाही तर काँग्रेसने तर या मुद्द्यावरुन NCBलाही सवाल विचारला आहे. छोट्या माश्यांवर कारवाई करणारी NCB मुंद्रा अदानी पोर्टमध्ये सापडलेल्या सुमारे २१ हजार कोटींच्या ड्रग्जबद्दल चकार शब्दही का काढत नाही, चौकशी का करत नाही, असा सवाल काँग्रेसच्या गोव्यातील नेत्या डॉ. शमा मोहम्मद यांनी उपस्थित केला आहे.
यासंदर्भात केरळचे माजी पोलीस महासंचालक एन.सी. अस्थाना यांनी द वायरशी चर्चा करताना "एवढ्या मोठ्या किंमतीचे ड्रग्ज एकाचवेळी पाठवण्याची हिंमत केली जाते याचा अर्थ यामागे मोठे नियोजन आणि पोर्टमधील कुणाची तरी मदत असल्याशिवाय ते शक्य नाही,"असे म्हटले आहे. दुसरीकडे गुजरातमधील कोर्टानेही या ड्रग्ज प्रकरणात मुंद्रा अदानी पोर्टच्या व्यवस्थापनाला यामध्ये काही फायदा मिळाला का याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एवढे सगळे असूनही गोदी मीडियाने सुमारे २१ हजार कोटींच्या ३ हजार किलो ड्रग्जच्या तस्करी प्रकरणाकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसते.
एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या जप्तीच्या कारवाईवर ना पंतप्रधानांनी गुप्तचर यंत्रणेचे कौतुके केले ना केंद्रीय गृहमंत्र्यांनी कौतुक केले....यावर गोदी मीडिया गप्प का, हा खरा सवाल आहे....सुमारे तीन हजार किलो ड्रग्ज जप्त झाले आहे. हे तीन हजार किलो ड्रग्ज सुमारे ७५ लाख ते १ कोटी लोकांनी सेवन केले असते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याचाच अर्थ एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक ड्रग्जच्या आहारी गेले आहेत. पण यावर ना मोदी सरकार काही बोलतंय.... ना भाजपचे नेते काही बोलतायत... ना गोदी मीडिया....पण एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आपल्या देशात पोहोचतंय हे मोदी सरकारचे अपयश नक्कीच म्हणता येईल...
अस्थाना यांची मुलाखत द वायरच्या या मूळ लिंकवरुन तुम्ही पाहू शकता
https://thewire.in/video/watch-the-story-of-rs-21000-crore-worth-of-drugs-seized-at-adani-owned-port