कमावत्या स्त्रिया का कमी होतायत?
X
बहुतांश घरात स्त्री-पुरुष नोकरी व्यवसाय करताना आपल्याला आढळतात मात्र सद्यस्थिती पाहता अनेक कमावत्या महिलांचा रोजगार सुटलेला आहे. मग ते सरकारच्या नोटाबंदीमुळे असो किंवा काही सामाजिक कारणास्तव असो. एकीकडे आर्थिक वाढीचा वेग गाठून विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू असताना महिला कामगारांचं घटतं प्रमाण चिंतेचा विषय होत चाललेला आहे. लग्न, बाळंतपण, पुरूषसत्ताक पद्धत, अशी सामाजिक अंगाकडे जाणारी कारणं त्यास जबाबदार आहेतच. ग्रामीण भागात काम करणाऱ्या १५ ते २४ वयोगटातल्या मुली आणि महिलांचं प्रमाण कमी होत आहे. त्याचं एक कारण म्हणजे शिक्षणाचा प्रसार तसंच रूढींपासून मुक्तता. लहान वयातच नोकरी करणाऱ्या मुली आता पुढील शिक्षणाची वाट धरू लागल्या आहेत.
तर दुसरीकडे घरातील पुरूषांच्या पगारात वाढ झाल्यावर, बहुतांश वेळी, तात्पुरती कामं करणाऱ्या महिला नोकरी सोडतात. त्यामुळंच कौटुंबिक उत्पन्नात स्थैर्य हा महिलांना मनुष्यबळातून बाहेर काढणारा मुख्य घटक आहे.
पण, केवळ हिच कारणं आहेत, असं नाही. तरीही भारतीय समाज पद्धतीमध्ये खास करुन महिलांसाठी लग्न हे नोकरी सोडण्याचे महत्त्वपूर्ण कारण आहे. पण ग्रामीण भागात अविवाहित महिलांपेक्षा नोकरी करणाऱ्या विवाहित महिलांची संख्या जास्त आहे. शहरी भागात हे प्रमाण नेमकं उलटं आहे. विशेष म्हणजे, वाढत्या आकांक्षा आणि संपन्नता यांच्यामुळे महिलांची मोठी फळी मनुष्यबळातून बाहेर पडते आहे. सर्वाधिक घट ही ग्रामीण भागात आहे, हे इथं लक्षात घ्यायला हवं. दरम्यान, ग्रामीण भागात दुष्काळ, नापिकी यामुळे ही शेतातील महिलांचा रोजगार कमी झाला आहे.
वरील सर्व गोष्टी लक्षात घेतल्या असता महिला कर्मचारी कमी होण्याची ही देखील कारणे आहेत. घऱात असणाऱ्या स्त्रियांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणं गरजेच आहे. जेणं करुन घर बसल्या त्या काम करु शकतील.