Home > मॅक्स रिपोर्ट > कोण आहे आरुसा आलम? जिच्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह यांना वारंवार स्पष्टीकरण द्यावं लागतं

कोण आहे आरुसा आलम? जिच्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह यांना वारंवार स्पष्टीकरण द्यावं लागतं

पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्याची पाकिस्तानी मैत्रीण आणि त्यामुळे निर्माण झालेला वाद नक्की काय आहे? कोण आहे ही पाकिस्तानी महिला ज्यामुळे महाराज अमरिंदर सिंह अडचणीत आले आहेत...

कोण आहे आरुसा आलम? जिच्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह यांना वारंवार स्पष्टीकरण द्यावं लागतं
X

पंजाबच्या राजकारणात कॅप्टन अमरिंदर सिंह पुन्हा चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी त्यांची तथाकथित पाकिस्तानी मैत्रिण अरुसा आलम यांच्यामुळे ते सध्या चर्चेत आहे. खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांनी अमरिंदर सिंह यांच्या मैत्रिणीचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आहेत.

अरुसा आलम च्या पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबतच्या फोटोबद्दल विचारले असता रंधावा म्हणाले,

'पंजाबला आयएसआयकडून धोका असल्याचे कॅप्टन सांगत आहेत. त्यामुळे आम्ही अरुसा आलमच्या आयएसआयशी असलेल्या संबंधांचीही चौकशी करू'.

असं सुखजिंदर सिंह यांनी म्हटलं आहे.

कोण आहे आरुसा आलम?

अरुसा आलम एक पाकिस्तानी संरक्षण पत्रकार आहे. तसेच त्यांना पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांची खास मैत्रीण म्हणून देखील ओळखलं जातं. त्या चंदिगड येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नियमित भेट देत असतात. .

दरम्यान, अमरिंदर सिंह यांना महाराज साहाब म्हणणाऱ्या अरुसा आलम 2017 मध्ये कॅप्टनच्या शपथविधी सोहळ्यात व्हीव्हीआयपी सीटवर होत्या.

दोघांची पहिली भेट कुठे झाली ?

कॅप्टन अमरिंदर सिंह 2004 मध्ये पाकिस्तानला गेले होते. तेव्हा अरुसा यांची त्यांच्याशी पहिली भेट झाली होती. अरुसा, ही माजी पत्रकार तसेच, 1970 च्या दशकात पाकिस्तानच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे समाजवादी नेते अकलीन अख्तर यांची मुलगी आहे. अरुसाची आईचे आणि लष्कराच्या अगदी जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांना तिथे 'क्वीन जनरल' म्हटले जाई.

दरम्यान, अरुसा आलमला तिच्या आईच्या लष्करी नेटवर्कचा वारसा मिळाला आहे. जेव्हा ती पत्रकार बनली, तेव्हा तिने संरक्षणावर वार्तांकन सुरु केलं. अगस्ता -90 बी पाणबुडी सौद्यांवरील अहवालामुळे त्या चांगल्याचं चर्चेत आल्या होत्या. या अहवालामुळे 1997 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन नौदल प्रमुख मन्सूरूल हक यांना अटक करण्यात आली होती.

कॅप्टनच्या बायोग्राफीमध्ये अरुसावर एक संपूर्ण चॅप्टर...

अरुसा विवाहित असून, तिला दोन मुले आहेत. तिला नेहमीच भारताबद्दल जाणून घेण्याची आवड होती. ती नेहमी म्हणत राहिली आहे की, तिला भारतात प्रवास करायचा आहे. मात्र, आरुसा आलम आणि अमरिंदर सिंह यांच्या नात्याची चर्चा पहिल्यांदा 2007 मध्ये झाली होती, जेव्हा दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले होते.

त्यानंतर, आरुसा आलमने स्पष्टीकरण दिलं होतं की, दोघेही फक्त मित्र आहेत.

अमरिंदर सिंह यांच्या बायोग्राफीमध्ये 'कॅप्टन अमरिंदर सिंग: द पीपल्स महाराजा' या अध्यायात त्यांच्या मैत्रीची किंवा नात्याची चर्चा झाली आहे. तसेच ही बायोग्राफी प्रसिद्ध पत्रकार खुशवंत सिंग यांनी लिहिलेली आहे.

Updated : 23 Oct 2021 3:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top