Home > मॅक्स रिपोर्ट > कोण आहेत नयनतारा सहगल ?

कोण आहेत नयनतारा सहगल ?

कोण आहेत नयनतारा सहगल ?
X

नयनतारा सहगल यांचे वडील रणजीत सीताराम पंडित हे विख्यात संस्कृत पंडित होते. त्यांनी 'कल्हना'च्या 'रजतरंगिनी' काश्मिरी संस्कृत ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले होते. ते थोर स्वातंत्र्य सेनानी देखील होते. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतल्यामुळे कारावास भोगत असताना १९४४ साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांची आई विजय लक्ष्मी पंडित यांनी देखील २ वर्ष कारावास भोगला ,त्या १९५३ साली युनो च्या आमसभेचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या पहिल्या महिला होत्या.

नयनतारा सहगल यांचे आजोळ नेहरू परिवारातील असूनही त्या राजकारणापासून नेहमी अलिप्त राहिल्या आहेत . सहगल यांनी स्वतःची ओळख मी नेहरू कुटुंबाची सदस्य म्हणून नव्हेतर स्वत: स्वतंत्रपणे निर्माण केलेली आहे. त्यांनी १९७० च्या इंदिरा गांधीच्या कालखंडात त्यांच्या विरुद्ध आणि जयप्रकाश आंदोलनाचे समर्थन करणारे अनेक लेख लिहिले होते. इंदिरा गांधी यांच्या सोबतच्या मतभेदामुळे त्यांची इटली येथे राजदूत म्हणून झालेली नेमणूक रद्द करण्यात आली होती.

मानवतावादी आणि स्त्रीवादी लेखिका म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांनी एकूण १८ पुस्तके लिहिली, त्यात ११ कादंबऱ्या, 2 गत अनुभव पर आत्मकथने आणि ५ संपादने आहेत. त्यांना मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार या साहित्य सेवेमुळे १९८६ साली मिळालेला होता.

नयनतारा सहगल यांची ग्रंथसंपदा ....

1) Prison and Chocolate Cake (memoir; 1954)

2) From Fear Set Free (memoir; 1963)

3) A Time to Be Happy (novel; 1963)

4) This Time of Morning (novel; 1965)

5) Storm in Chandigarh (novel; 1969)

6) The Freedom Movement in India (1970)

7) Sunlight Surrounds You (novel; 1970) (with Chandralekha Mehta and Rita Dar.

8.) The Day in Shadow (novel; 1971)

9) A Voice for Freedom (1977)

10)Indira Gandhi's Emergence and Style (1978)

11) Indira Gandhi: Her Road to Power (novel; 1982)

12) Plans for Departure (novel; 1985)

13) Rich Like Us (novel; 1985)

14) Mistaken Identity (novel; 1988)

15) A Situation in New Delhi (novel; 1989)

16) Lesser Breeds (novel; 2003)

17)Relationship (collection of letters exchanged between Nayantara Sahagal and E.N.Mangat Rai;(1994)

18) Before Freedom: Nehru's Letters to His Sister1909-1947 (edited by Nayantara Sahgal)

आणीबाणीचा कडाडून विरोध करणा-या नयनतारा सहगल यांनी भारतात वाढलेल्या असहिष्णुतेबद्दल भारत सरकारचा साहित्य अकादमीचा पुरस्कार वापस केल्यानंतर सत्ताधारी भाजप कडून त्यांच्यावर अत्यंत अश्लाघ्य शब्दांत टीका केली गेली होती.

विशेष म्हणजे आणीबाणी विरोधात लढा देणा-या आणि कारावास भोगणा-यांचा आम्ही सन्मान करतो, असे म्हणत अशा आणिबाणी विरोधक कारागृहींना पेन्शन देण्याची घोषणा करणा-या मोदी सरकारच्या काळात, त्यांना साहित्य संमेलनाच्या उदघाटन सत्राचे आमंत्रण देऊन पुन्हा मात्र तुम्ही येवू नका असे सांगण्यात आले आहे! आमंत्रण देऊन, नका येवू म्हणण्याचे धाडस कोणीही नैतिक व्यक्ती करू शकत नाही. या साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला नयनतारा सहगल यांना आमंत्रित केले ही जेवढी आनंदाची बाब होती, त्याच्या लाखोपटीने त्यांना येवू नका असे म्हणणे लाजीरवाणी बाब आहे. संमेलन आयोजकांच्या या कृतीचा निषेध करावा तेवढा कमीच.

राज कुलकर्णी

प्रवक्ता, फ्रेंडस ऑफ डेमॉक्रसी

Updated : 7 Jan 2019 7:51 PM IST
Next Story
Share it
Top