Home > मॅक्स रिपोर्ट > सत्ताधारी भाजपच्या जाहीरनाम्यात महिलांना मिळणार या सोई-सुविधा ?

सत्ताधारी भाजपच्या जाहीरनाम्यात महिलांना मिळणार या सोई-सुविधा ?

सत्ताधारी भाजपच्या जाहीरनाम्यात महिलांना मिळणार या सोई-सुविधा ?
X

2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 20 जणांची जाहीरनामा समिती गटित केली असून यात राजनाथ सिहं, अरुण जेटली, निर्मला सीतारमन, थावरचंद गेहलौत, रवि शंकर प्रसाद, पीयूष गोयल, मुख्तार अब्बास नकवी, के. जी. अलफोंस, शिवराज सिंह चौहान, किरण रिजूजू, सुशील मोदी, केशव प्रसाद मौर्य, अर्जुन मुंडा, राममाधव, भूपेंद्र यादव, नारायण राणे, मीनाक्षी लेखी, डॉ. संजय पास्वान, हरी बाबू आणि राजेंद्र मोहन सिंह चीमा यांचा समावेश आहे. मात्र या 20 जणांच्या समितीमध्ये महिला प्रतिनिधी म्हणून संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन आणि खासदार मीनाक्षी लेखी या दोनच महिलांचा समावेश आहे. मात्र भाजपच्या जाहीरनाम्यात नेमकं महिलांसाठी काय असणारेय हे जाणून घेण्यासाठी मॅक्समहाराष्ट्रने भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांच्याशी संवाद साधला असता

  • अल्पवयीन मुलीवर काही अत्याचार झाल्यास आरोपीला होणाऱ्या शिक्षेची अमंलबजावणी केंद्रसहित प्रत्येक प्रदेशातही लागू करणार.
  • बेटी बचाव, बेटी पढाओ या योजनअंतर्गत सरकार मदत करणार.
  • ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी मोफत सायकल देणार तसेच प्राथमिक शिक्षण मोफत देणार
  • मुद्रा बँकेअंतर्गत 70 टक्के लोन महिलांना मिळणार
  • ट्रिपल तलाक वर भर देणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान सत्ताधारी पक्ष महिलांसाठी काहीही नवीन योजना न आणता हेच जुने मुद्दे जाहीरनाम्यात असणारेय असं पाहायला मिळतेय.

Updated : 15 Jan 2019 4:57 PM IST
Next Story
Share it
Top