Home > Election 2020 > नागरिकांची प्रगती व विकासासाठी आम्ही नव्या सरकार सोबत काम करण्यास तयार - काँग्रेस
नागरिकांची प्रगती व विकासासाठी आम्ही नव्या सरकार सोबत काम करण्यास तयार - काँग्रेस
Max Maharashtra | 31 May 2019 10:08 AM IST
X
X
भारत देश आणि देशाच्या नागरिकांची प्रगती आणि विकासासाठी आम्ही नव्या सरकारच्या सोबत काम करण्यासाठी तयार आहोत, असं ट्विट काँग्रेसनं केलय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गोपनीयतेची शपथ घेत असताना विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने ट्विट करत पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्यात. नव्या सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधी समारंभात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग उपस्थित होते. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेल्या लोकसभेच्या ५५ जागा काँग्रेसला मिळालेल्या नाहीत. काँग्रेसच्या देशभरात फक्त ५२ जागा जिंकून आल्या आहेत. त्यामुळे विरोदी पक्षनेतेपद कुणाला मिळणार हे पहाण महत्वाचं ठरणार आहे.
https://twitter.com/INCIndia/status/1134111778026283008
Updated : 31 May 2019 10:08 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire