Home > Election 2020 > महाराष्ट्रात उष्णतेची लाट

महाराष्ट्रात उष्णतेची लाट

महाराष्ट्रात उष्णतेची लाट
X

दरवर्षी महाराष्ट्रात मान्सून ७ जूनला दाखल होतो. मात्र यंदा मान्सून १३ जूननंतर मान्सून मुंबईत दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. साधारणतः ७ ते १० जूनदरम्यान मान्सून मुंबईत दाखल होतो. मात्र या वर्षी मान्सूनपूर्व पावसानेही मुंबईत दडी मारली आहे. मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश नोंदविण्यात आले असून, वाढता उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती. कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईचे कमाल तापमान ३४ ते ३५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. आर्द्रता ६० ते ७० टक्क्यांच्या आसपास आहे. कमाल तापमान ३४ अंशावर स्थिर असले तरी आर्द्रतेमध्ये चढउतार नोंदविण्यात येत आहेत.मुंबईत आकाश ढगाळ राहील. ४ आणि ५ जूनला मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

कोकण गोवा,मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ७ जूनला काही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ४ आणि ५ जूनला उष्णतेची लाट येईल. ६ आणि ७ जूनला विदर्भात उष्णतेची लाट येईल. गोव्यासह राज्यात ४ ते ६ जूनला तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

Updated : 4 Jun 2019 12:44 PM IST
Next Story
Share it
Top