Home > मॅक्स रिपोर्ट > जनतेचा जाहीरनामा : वडाळा भागात महिलांच्या शौचालयाचा प्रश्न गंभीर

जनतेचा जाहीरनामा : वडाळा भागात महिलांच्या शौचालयाचा प्रश्न गंभीर

मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली आहे. त्यापार्श्वभुमीवर राजकीय धुळवड रंगली आहे. मात्र दुसरीकडे सर्वसामान्यांचे प्रश्न कायम आहेत. त्यातच वडाळा भागात महिलांच्या शौचालयाचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. पण हा प्रश्न काय आहे याचा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रसन्नजित जाधव यांनी जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमात वेध घेतला आहे.

जनतेचा जाहीरनामा : वडाळा भागात महिलांच्या शौचालयाचा प्रश्न गंभीर
X

मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. मात्र शहरातील अनेक भागांमध्ये मुलभूत सुविधा पोहचल्या नसल्याचे चित्र आहे. याचाच वेध मॅक्स महाराष्ट्र जनतेच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून घेत आहे.





मुंबईतील वडाळा भागातील वॉर्ड क्रमांक 181 येथे महापालिकेच्या महिला शौचालयांची दुरावस्था झाली आहे. त्यातच महिलांच्या शौचालयांना दरवाजे नसल्याचे भीषण वास्तव मॅक्स महाराष्ट्रने समोर आणले आहे. या भागात पुष्पा कोळी या नगरसेविका आहेत. मात्र त्या महिला असूनही महिला शौचालयाचा प्रश्न सोडवू शकल्या नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक महिलांमध्ये लोकप्रतिनिधींच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे.

यावेळी महिलांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले की, शौचालयाचे दरवाजे तुटले आहेत. आतमधील स्टाईल्स तुटल्या आहे. त्यामुळे एक महिला शौचालयाच्या भांड्यासह आत पडली. त्यामुळे महिला गंभीर जखमी झाली होती. एवढंच नाही तर महिलांचे शौचालय साफ करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी कधी आठ दिवसातून एकदा तर कधी पंधरा दिवस इकडे फिरकत नाहीत. त्यामुळे शौचालयात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे पहायला मिळते. यामुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.




या भागात आमदारांच्या सहाय्याने महापालिकेच्या खासगी जागेवर शौचालय बनवले आहे. ते बेकायदेशीर आहे. याचा वापर फक्त पुरुषांसाठी होतो. मात्र महिलांच्या शौचालयाच्या प्रश्नाकडे कुणीच लक्ष देत नाही, त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

Updated : 17 Oct 2022 7:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top