Home > Election 2020 > VVPAT धोकादायक... मतदान गुप्त राहिलं नाही

VVPAT धोकादायक... मतदान गुप्त राहिलं नाही

VVPAT धोकादायक... मतदान गुप्त राहिलं नाही
X

मतदान कुणाला केलं हे गुप्त राहायला हवं यासाठी निव़डणूक आयोग प्रंचंड खबरदारी घेत असतं. वैयक्तिक गुप्ततेबरोबरच एखाद्या विभागात कसं मतदान झालंय हे कळू नये म्हणून मशिन्सही मिक्स केल्या जातात. मात्र या सर्व खबरदारींच्या उपायांना हरताळ फासला गेला आहे. EVM वरच्या वाढत्या संशयाला दूर करण्यासाठी व्हीव्हीपॅट चा वापर करण्यात आला. मात्र या व्हीव्हीपॅट पावत्यांचा गैरवापर झाल्याचं लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात समोर आलं आहे.

आयटी तज्ज्ञ रवी घाटे यांनी व्हीव्हीपॅटचा गैरवापर झाल्याचा आरोप केला आहे. व्हीव्हीपॅट पावतीचा फोटो काढून मतदार आपापल्या उमेदवारांना मतदान केल्याचा पुरावा सादर करतात आणि उमेदवारांकडून पैसे घेत असल्याचं, रवी घाटे यांनी म्हटलंय.

याआधी कुणाला मतदान केलंय हे कळायची सोय नसल्याने सरसकट पैशांचं वाटप केलं जायचं, मात्र आता व्हीव्हीपॅटमुळे थेट पुरावाच सादर करण्याची सोय असल्याने उमेदवार मतदारांना मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅटचा फोटो दाखवायला सांगत आहेत.

सौजन्य : रविंद्र घाटे यांच्या फेसबुकवरुन साभार

व्हीव्हीपॅटमुळे लोकशाहीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून मतदान केंद्रावर या लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये मोबाइल फोन, कॅमेरा यांच्यावर बंदी आणायला हवी असं मत रवी घाटे यांनी व्यक्त केलं आहे.

https://youtu.be/UNUKqVxfSgM

Updated : 12 April 2019 10:05 AM IST
Next Story
Share it
Top