#गावगाड्याचे इलेक्शन : गावाला रस्ता नाही म्हणून मतदानावर बहिष्कार
निवडणुका या सामान्यांच्या प्रश्नांवर लढल्या गेल्या पाहिजेत असे सांगितले जाते. पण औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावात मात्र मतदारांनी आपल्या प्रश्नांसाठी मतदानावरच बहिष्कार टाकला आहे.
X
औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील थेरगाव येथील गाडे व उबाळे या शेतवस्त्यांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही रस्त्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे....या लोकांच्या हाकेला कुणीच प्रतिसाद देत नसल्याने ते हतबल झाले आहेत....हे कुटुंबीय गावांपासून दोन किलोमीटर अंतरावर वस्ती करून राहतात.
येथील दीडशेच्या जवळपास शाळकरी मुले तर उर्वरित महिला- पुरुष शाळा व विविध गरजांसाठी गावात ये-जा करतात.... पावसाळ्याच्या चार महिन्यानंतरही हा रस्ता पाणंद रस्ता असल्याने व यंदा परतीच्या पावसाने सर्वत्र नदी-नाल्यांना पूर आल्याने रस्त्यावर अजूनही चिखल आहे...मात्र प्रशासन दखल घेत नसल्याने या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
पावसाळा सुरू झाला की, शेतवस्तीवरील ग्रामस्थांना वाहत्या पाण्यातून आणि चिखलातून जीवघेणा प्रवास करावा लागतो.... शाळेसह दैनंदिन गरजा पुर्ण करण्यासाठी गावांत येण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याने जीवघेणा संघर्ष त्यांच्यासाठी नेहमीचा झाला आहे.. थेरगाव प्रमाणे कित्येक अशा शेतवस्त्या आणि वाड्यांवर अशीच परिस्थिती आहे...त्यामुळे सरकारने नुसत्या घोषणांचा पाऊस पाडण्यापेक्षा प्रत्यक्षात या वस्त्यांचा विकास करण्याची गरज आहे...