विरेंद्र सेहवाग निवडणूक लढणार? लोकसत्ताची न्यूज ठरली फेक
X
राजकीय बातम्यांमध्ये पतंग उडवलेली चालते, असा सर्वसाधारण पत्रकारांचा समज असतो. त्याचमुळे कळतय-समजतंय अशा आशयाच्या बातम्या सर्रास दिल्या जातात. लोकसत्ता या वृत्तपत्राने विरेंद्र सेहवाग भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढणार असल्याची बातमी दिली होती. या बातमीचं ट्वीट ही लोकसत्ता ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून केलं होतं. मात्र विरेंद्र सहवाग याने मराठीतच या बातमीला उत्तर दिलं आहे. ही बातमी खोटी आहे असं विरेंद्र सहवागने आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.
भाजपाच्या तिकीटावर विरेंद्र सेहवाग लढणार लोकसभा निवडणूक ? https://t.co/53X1SsZ5n9 via @LoksattaLive @virendersehwag #LokSabhaElection2019 #LokSabhaElections2019
— LoksattaLive (@LoksattaLive) February 7, 2019
Some things never change, like this Rumour. Same in 2014, and no innovation even in Rumour in 2019. Not interested then, not interested now. #BaatKhatam#5YearChallenge pic.twitter.com/XhY7TkxfpD
— Virender Sehwag (@virendersehwag) February 8, 2019