Home > मॅक्स रिपोर्ट > शबरीमाला मंदिर प्रवेश प्रकरणी केरळमध्ये हिंसाचार

शबरीमाला मंदिर प्रवेश प्रकरणी केरळमध्ये हिंसाचार

शबरीमाला मंदिर प्रवेश प्रकरणी केरळमध्ये हिंसाचार
X

शबरीमाला येथे अयप्पा मंदिरात महिला प्रवेशानंतर केरळमधील वातावरण चांगलचं तापलं आहे. गुरुवारी (३ जानेवारी ) हिंदू संघटनांकडून केरळमध्ये बंद पाळण्यात आला. या बंदचे पडसाद राज्यभरातही उमटले. या हिंसाचारात एक ठार तसेच ३८ पोलिसांसह १०० हून अधिक लोक जखमी झाले आहे. या हिंसाचाराप्रकरणी ७४५ जणांना अटक करण्यात आली आहे. बंद दरम्यान काही वाहनांची आणि दुकानांती तोडफोड करण्यात आली असून पोलीस ठाण्यांवर हल्ले करण्यात आले

हिंदू संघटनांच्या शिखर संस्थेने बंदची हाक दिली होती. या बंदला भाजपने पाठिंबा दिला होता. काँग्रेसनेही काळा दिन पाळला. तसेच पंडालम, कोळीकोड, कासारगोडे, ओट्टपलम येथे निदर्शकांनी काही पक्षांच्या कार्यालयावर हल्ले चढविले. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. कोळीकोड येथे अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. या सर्व घडामोडीमध्ये पल्लकड येथे सुरु असलेल्या संघ, भाजपाच्या मोर्चात पत्रकारांना मारहाण करण्यात आली.

अयप्पा मंदिरात महिला दर्शन घेऊन निघून जाताच मुख्य पुजाऱ्याने मंदिर शुद्धीकरणासाठी मंदिर एक तास बंद ठेवलं होतं. दरम्यान या मूळ निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी 49 याचिका न्यायालयात आल्या असून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर 22 जानेवारी रोजी त्यावर सुनावणी होणार आहे.

पाहा हा व्हिडिओ..

https://youtu.be/VbgIyLvCcSY

Updated : 4 Jan 2019 12:13 PM IST
Next Story
Share it
Top