Home > मॅक्स रिपोर्ट > जीव धोक्यात घालून गावकऱ्यांचा पुरातून प्रवास, जबाबदार कोण?

जीव धोक्यात घालून गावकऱ्यांचा पुरातून प्रवास, जबाबदार कोण?

जीव धोक्यात घालून गावकऱ्यांचा पुरातून प्रवास, जबाबदार कोण?
X

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गौळ बुद्रुक गावाचा तीन दिवसांपासून संपर्क तुटला आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना पुरातून प्रवास करावा लागतो आहे. पुसद तालुक्यातील पैनगंगेच्या तीरावर असलेल्या गौळ ब्रूद्रुक या गावाचा संपर्क मागील तीन दिवसांपासून तुटला आहे. मागील 5 दिवसांपासून परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गावाच्या मागच्या बाजूने पैनगंगेचा पूर गावाला येऊन भिडत असतो तर गावासमोरून वाहणाऱ्या लेंडी नदीला पुर आल्याने गावचा चारही बाजूने संपर्क तुटतो.

गौळ बुद्रुक येथील लेंडी नदीवरील पुलांची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी वाहून गावाचा संपर्क तुटत असतो. अनेक गावकऱ्यांची शेती लेंडी नदीच्या पलीकडे आहे. शेतातील गोठ्यात दोन दिवसांपासून जनावरं उपाशी बांधून ठेवल्याने शेतकऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात टाकून पुराच्या पाण्यातून जनावरांच्या चारा पाण्यासाठी जावं लागत आहे. तर गावात वीजही नसल्याने ग्रामस्थांना दळण डोक्यावर घेऊन पुराच्या पाण्यातून शेंबाळपिंप्री येथे जावे लागते आहे. गावातील शिक्षकांनाही पुराच्या पाण्यातून गावात येण्याची वेळ आली आहे.


Updated : 14 July 2022 8:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top