पाठीवरचं घर

पाठीवरचं घर
X

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना तळावर आलेल्या ऊस तोड कामगार कामगारांशी संवाद साधला असताना ऊसतोड कामगारांचे प्रश्न आणि आयुष्य कसं जगतायत ते… याचा आढवा घेतलाय हेमंत गायकवाड यांनी पाहा हा व्हिडिओ…

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/2647907815235892/

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गावाकडे दुष्काळ असल्याने रोजच जीवन जगण्यासाठी किंवा काही कारणासाठी

maxwoman

मुकादमाकडून उचल घेतात व ही उचल फेडण्यासाठी इथे ऊसतोडायला येतात. बरीच लोकं 15 - 16 वर्ष झालं ऊस तोडायला येत आहेत. काही लोक म्हणाली आम्ही 1 - 2 कारखान्यावर ऊसतोडला परंतु आम्हाला या कारखान्यावर बर वाटत, इथली सोय चांगली आहे,लोक चांगली आहेत, बागायतदार पण चांगली आहे त्यामुळं आम्हाला काही अडचणी येत नाही. मुकामदमाकडून दिड ते दोन लाख उचल घेतली आहे.

[button color="" size="" type="3d" target="" link=""]

यावर्षी घेतलेली उचल फिटनार नाही कारण यावर्षी दुष्काळ जास्त असल्याने भरपूर लोक ऊसतोडायला आलेली आहे 4 खेपा आल्या की 5 व्या दिवशी खाडा असतो. काही वेळा 2 दिवस पण खाडा असतो. एक खेप आणली तर 900 रुपये मिळतात. वाडं विकुन, दूध, दही, टाक विकून घरचा खर्च भागवला जातो, परंतु ज्यांनी गुर आणली नाही ते फक्त वाडं विकून खर्च भागवतात. असं सांगितलं आहे.

[/button]

maxwomanऊसाच्या भेळ्यापासून (पेंढे) तयार केलं झोपडं.

ऊसतोडणीला पहाटे ३ वाजता जावं लागतं…

maxwoman

सकाळी 3 वाजता ऊस तोडायला जातात. महिला फडात गेल्यानंतर ऊस तोडने, मोळया बांधने अशी काम करताता आणि पुरुषही ऊस तोडने, मोळया बांधने याच्या बरोबर गाडी भरण्याच पण काम करतात. घरी आल्यानंतर महिलांना गुरांसमोरचा राडा काढणे,कोप व त्याशेजारच झाडने, कोप व चूल सारवने, पाणी भरणे, धुनी- भांडी करणे, स्वयंपाक करने ही काम करावी लागतात आणि पुरुष कारखान्यात भरून आणलेली गाडी खाली करण्यासाठी जातात. पहिल्यांदा ऊस तोडताना त्रास झाला येत न्हवतं पण आता सवय झाली.आता काही वाटत नाही. असं काही महिलांनी सांगितलं..

Updated : 19 Feb 2019 7:45 PM IST
Next Story
Share it
Top