सोन्याचा भाव का वाढला?
आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया युक्रेन च्या युद्धाचे ढग आधिक गडद होतांना दिसत असल्याने त्यातच डॉलर चे भाव वाढल्याने आंतरराष्ट्रीय सोने भावात पुन्हा तेजी आली आहे.भारताचाच विचार केला तर आठवड्याभरात सोन्याच्या प्रति तोळासाठी (10 ग्रॅम ) दीड हजारांची वाढ झाली आहे, प्रतिनिधी संतोष सोनवणे यांनी जळगाव सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूपकुमार लुंकड यांच्याशी केलेली चर्चा ...
X

सोने खरेदी साठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव सराफा बाजार आज खुला होताच 24 कॅरेट साठी प्रति तोळा 51 हजार रुपये पर्यंत उंचांकी भाव पोहचला , तर 22 कॅरेट साठी 46 हजार 500 रुपये एवढा भाव आहे. गेल्या सोमवारी सोन्याचे भाव 49,500 इतका होता, तोच भाव दीड हजारांनी वाढून 51 हजारांपर्यंत पोहचला आहे.शुक्रवार पासून सोने भाव अधिक वाढले, शुक्रवारी 50 हजार 400 इतका भाव होता आज पुन्हा वाढून 51 हजार वर पोहचला आहे.म्हणजे आठवड्याभरात दीड हजार रुपयांची सोने भावात वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी म्हणजेच 2021 नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात 48 हजार 500 प्रति तोळा भाव होता , 2022 या नवीन वर्षी पदार्पनाच्या जानेवारीच्या महिन्यात 49 हजार रुपये प्रति तोळा भाव होता. 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे जगात असुरक्षतेच्या कारणामुळे सर्वाधिक 54 ते 56 रुपये प्रति तोळा इतका सोन्याचा उंचांकी भाव पोहचला होता.
'कोरोना लस' आल्यानंतर सोन्याचे भाव खाली आले होते.आता मात्र पुन्हा सोन्याचे भाव वाढत आहे. सोनेचांदी भाव संबंधातील जाणकार तसच जळगाव सराफ असोसिएशन चे सचिव स्वरूपकुमार लुंकड सांगतात की युक्रेन वरून अमेरिका आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या शक्यतेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने बाजारात त्याचा परिमाण पाहायला मिळातोय, शुक्रवारी रशिया आणि अमेरिका यांच्या युद्धाच्या भाषेमुळे त्याचा थेट परिमाण आंतरराष्ट्रीय सोने बाजारात झाला, त्यातच डॉलर चे भाव ही वाढले ह्यामुळे सोने भावात उसळी आली आहे.
जळगावातीलच सोने व्यावसायिक संतोष खोंडे यांनी सांगितले की युक्रेन युद्धाचे ढग असल्याने सोन्याचे भाव वाढले असच युद्धाचे ढग कायम राहिले तर भाव आणखीन वाढतील अशी श्यक्यता खोंडे यांनी वर्तवली आहे. भारतीय सोनेचांदी व्यवसायात ह्याचा परिमाण पाहायला मिळेल, ऐन लग्न सराई आहे त्याचा फटका सर्वसामान्य सोने खरेदी ग्राहकांना बसेल.