Home > मॅक्स रिपोर्ट > MaxMaharashtraImpact : त्या दोन वाहन चालकांचे निलंबन, आणखी चार जणांवर होणार कारवाई

MaxMaharashtraImpact : त्या दोन वाहन चालकांचे निलंबन, आणखी चार जणांवर होणार कारवाई

MaxMaharashtraImpact : त्या दोन वाहन चालकांचे निलंबन, आणखी चार जणांवर  होणार कारवाई
X

चिमुकल्याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी पोहोचविण्यास नकार देणाऱ्या दोन कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना तात्काळ निलंबित केल्याची माहिती पालघर जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय बोदाडे यांनी दिली आहे

आतिष गुरव आणि रवी मुकणे या दोन कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना निलंबित करण्यात आला असून अजून चार जणांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

मंगळवारी रात्री एका सहा वर्षीय चिमुकल्याचा जव्हारच्या कुटीर रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह घरी पोहोचवण्यासाठी या रुग्णवाहिका चालकांनी नकार दिल्यानंतर हा मृतदेह मोटारसायकल वरून नातेवाईकांनी घरी न्यावा लागला होता.

Max maharashtra ने सर्वप्रथम ही बातमी प्रसिध्द केली होती. त्यानंतर प्रशासन हादरुन गेलं होतं. वरीष्ठ पातळीवरुन आदेश आल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठकांचे सत्र झाले. अखेर दोन कंत्राटी वाहनचालकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात जबाबदार असलेल्या इतर डॉक्टर आणि अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी होत आहे.

Updated : 27 Jan 2022 7:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top