Home > मॅक्स रिपोर्ट > चला करूया सफर रेडिओ स्टेशनची...

चला करूया सफर रेडिओ स्टेशनची...

आजकाल बाजारात अनेक उपकरणं आली असली अनेक म्युझिक ऍप्स उपलब्ध असले तरी एफ एम रेडीओची मजा काही औरच! त्याच रेडीओचं काम कसं चालतं याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी....

चला करूया सफर रेडिओ स्टेशनची...
X

रेडिओ हा अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो, मात्र विविध कार्यक्रमांची निर्मिती करून ते कार्यक्रम प्रसारित केले जातात. या कार्यक्रम निर्मितीमागे प्रचंड मेहनत असते. रेडिओ निवेदक बोलतो, आपले मनोरंजन करतो , ज्या रेडिओ केंद्रावरून ही संपूर्ण प्रक्रिया होत असते ते रेडिओ केंद्र कसे असेल ?

हा प्रश्न तुम्हाला स्वाभाविकपणे पडला असेल. रेडिओचे प्रसारण कशा पद्धतीने केले जाते? कार्यक्रमांची निर्मिती कशी होते? आपल्याला दूरपर्यंत रेडिओ वरती प्रसारण ऐकायला कसे येतं ? या तुमच्या आमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही रेडिओ वत्सगुल्म वाशिम या रेडिओ केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया जाणून घेतली.

सर्वप्रथम कार्यक्रमाची स्क्रिप्ट तयार केली जाते. तदनंतर कार्यक्रम रेकॉर्ड होतो. नंतर तो एडिट केला जातो. संपूर्णपणे एडिट झाल्यानंतर संगणकाच्या माध्यमातून प्रसारित करून तो ट्रान्समीटर या यंत्राच्या साह्याने रेडिओ केंद्राच्या टॉवर पर्यंत पोहोचवला जातो . नंतर तो आपल्या रेडिओ वरती ऐकायला येतो. अशी ही संपूर्ण प्रक्रिया असते. या नावीन्यपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी.


Updated : 31 Oct 2022 8:05 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top