Home > मॅक्स रिपोर्ट > आगीत गर्भवती महिलांचा कोंडला श्वास

आगीत गर्भवती महिलांचा कोंडला श्वास

आगीत गर्भवती महिलांचा कोंडला श्वास
X

मुंबईत अंधेरीमधल्या कामगार रुग्णालयाला आग लागल्यामुळे कर्मचारी आणि रुग्णांची चांगलीच तारांबळ उडाली. अग्निशमनदलाने आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र धुराचे लोट दोन तासानंतरही येत असल्याने रुग्णालयामध्ये अडकलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा श्वास कोंडला आहे. यात विशेषतः गर्भवती महिला, लहान मुलं यांच्या वॉर्डात परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्या सगळ्यांना सुरक्षीत बाहेर काढण्यासाठी फायर ब्रिगेड युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. ज्या रूग्णांचं नुकतच ऑपरेशन झालं आणि जे हालचाल करू शकत नाही तसेच गर्भवती महिलांना कसं बाहेर काढायचं हा फायर ब्रिगेडसमोर प्रश्न आहे. रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांना शिडीने खाली उतरविण्याचे बचावकार्य अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. या आगीत अडकलेल्या गर्भवती महिलांनासमोर ही भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे आपल्या सोबत आपल्या बच्चूचा जीव कसा वाचवावा असा प्रश्न त्यांच्यासमोर पडलाय.

Updated : 17 Dec 2018 7:41 PM IST
Next Story
Share it
Top