ती बातमीच तथ्यहीन – शरद पवार
Max Maharashtra | 30 May 2019 6:46 PM IST
X
X
लोकसभा निवडणुकीत देशभरातील विरोधी पक्षांना मागे टाकत भाजपनं घवघवीत यश संपादन केलंय. त्यानंतर विरोधकांमध्ये मोठी फूट पडण्याचा अंदाज वर्तवला जात होता. त्यातच एक बातमी आली की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार असल्याबाबत. मात्र, खुद्द शरद पवारांनीच पक्ष विलिनीकरणाची बातमी फेटाळून लावत ती बातमीच बेसलेस (तथ्यहीन) असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण काँग्रेसमध्ये करून सुप्रिया सुळे यांना लोकसभेतलं विरोधी पक्षनेते पद मिळेल, अशा बातम्यांनाही त्यामुळं पूर्णविराम मिळालाय. काँग्रेसकडे लोकसभेत सध्या ५२ सदस्यांचं पाठबळ आहे त्यामुळं त्यांना लोकसभेतलं विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी आणखी ३ सदस्यांची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ खासदार लोकसभेवर निवडून आले आहेत शिवाय नवनीत राणा या पुरस्कृत अपक्ष आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसकडे ६ सदस्य आहेत. अशा परिस्थितीत हा संपूर्ण गटच काँग्रेसमध्ये विलिन करून विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेतलं जाऊ शकतं, अशा अनुषंगानं सकाळपासूनच बातम्या आणि चर्चांना ऊत आला होता. त्यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिल्यानं आता पूर्णविराम मिळालाय.
Updated : 30 May 2019 6:46 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire