“दिल्ली बस” चित्रपटाचा सुन्न करणारा ट्रेलर रिलीज...
X
१६ डिसेंबर २०१२च्या रात्री दिल्लीतील वसंत विहार भागात सहा नराधमांनी ‘निर्भया’वर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला होता. अत्यंत भयानक अशी ही घटना. मरणाशी झूंज देत असतानाच २९ डिसेंबर २०१२ ला तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशात आंदोलने पेटली होती. तिच्यावर बलात्कार करणा-या नराधमांना फाशीची शिक्षा देखील झाली. परंतू ही घटना देशाला हादरवणारी होती.
आज 2018 मध्ये या घटनेला सहा वर्ष पूर्ण झाली. या घटनेवर आधारीत एक हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. “दिल्ली बस” असे या चित्रपटाचे नाव असून त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ह्या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना अंगावर अक्षरश: शहारे येतात. या चित्रपटातील निर्भयाच्या भूमिकेत दिव्या सिंग ही अभिनेत्री दिसणार आहे. नीलिमा आझमी, अंजन श्रीवास्तव, संजय सिंग असे अनेक कलाकार देखील या चित्रपटात पाहावयास मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक शारिक मिन्हाज यांनी हा चित्रपट म्हणजेच निर्भयासाठी श्रद्धांजली असल्याचे म्हटले आहे.