अपेक्षित बदल घडतोय !
X
विटाळ समजल्या जाणाऱ्या मासिक पाळीचे समुपदेशन थेट विठ्ठल मंदिरात
देशातील 52 % महिला आज ही पॅड वापरत नाहीत आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे भारतात 42 % मुली या मासिक पाळी सुरू झाल्यानंतरच्या काळात शाळेत जायचं बंद करतात, कारण मासिक पाळीविषयी अज्ञान, गैरसमज आणि काय वापरावे याची माहिती नसणे. शबरीमाला प्रवेशावरून मासिक पाळीसंदर्भात खालच्या पातळीवर वक्तव्य व्यक्त केली जात असताना 'समाजबंध'चे मासिक पाळी व्यवस्थापन समुपदेशन अतिदुर्गम अशा गुहिनी गावातील मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात होणं ही नक्कीच आशादायक आणि सकारात्मक घटना आहे. गावातील महिला किंवा पुरुष कुणीच यासाठी हरकत घेतली नाही हे विशेष. भोर तालुक्यातील या गावात जिथे आज ही फोनला range देखील येत नाही तिथे बाकी आरोग्य सेवा तर दुर्लभच. उपस्थित पैकी बऱ्याच मुली व महिलांना अपेक्षेप्रमाणे मासिक पाळीतील समस्या होत्याच, त्याविषयी सखोल माहिती सोबतच वापरण्यासाठी 'आशा पॅड' चा पर्याय दिल्याने महिला न लाजता कार्यक्रमात सहभागी झाल्या.