Home > मॅक्स रिपोर्ट > तीन महिन्या पासून सोसायटी रजिस्ट्रेशन च्या वेब साईट मध्ये तांत्रिक बिघाड

तीन महिन्या पासून सोसायटी रजिस्ट्रेशन च्या वेब साईट मध्ये तांत्रिक बिघाड

तीन महिन्या पासून सोसायटी रजिस्ट्रेशन च्या वेब साईट मध्ये तांत्रिक बिघाड
X

शेकडो इमारतींचे रजिस्ट्रेशन रखडले, नागरिक परेशान

कल्याण एकीकडे सरकार डिजिटल इंडियाचा प्रचार करीत आहे, डिजिटल खेडे, डिजिटल स्टेशन, शहर आणि काय-काय, मात्र गेली 3 महिने झाले सोसायटी रजिस्ट्रेशन च्या वेब साईट मध्ये तांत्रिक बिघाड असून नागरिक कल्याण येथील कार्यालयात चकरा मारून हैराण झाले आहे, अखेर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे

काय असते सोसायटी रजिस्ट्रेशन

कुठल्या जागेवर इमारत उभी राहिल्यास, त्या इमारती मध्ये फ्लॅट घेणाऱ्या कुटुंबाना मालकी हक्क मिळण्यासाठी सोसायटी रजिस्ट्रेशन गरजेचे असते. सोसायटी रजिस्ट्रेशन जर झाले नसेल तर फ्लॅट धारकाला आपला फ्लॅट विकायचा असेल किंवा जुनी झालेली इमारत तोडून पुन्हा बनवायची असेल तर त्यासाठी सोसायटीचे रजिस्ट्रेशन झालेले असणे गरजेचे असते नाहीतर यासाठी बिल्डर किंवा जमीन मालकाकडे जावे लागते, त्या मालकाने लेखी परवानगी दिल्याशिवाय काहीच करता येत नाही.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात डीम कॉन्व्हेस च्या आधारावर जुन्या इमारती, व घरांचे रजिस्ट्रेशन चा पर्याय निर्माण करण्यात आला होता . त्यामुळे हजारो जुन्या इमारतीत फ्लॅट असणाऱ्या फ्लॅट धारकांना मालकाच्या मदतीशिवाय सोसायटी रजिस्ट्रेशन चा पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे हजारो जुन्या इमारतीचे देखील सोसायटी रजिस्ट्रेशन करणे शक्य झाले आहे.

काय आहे वेब साईट मध्ये तांत्रिक बिघाड

मात्र गेल्या तीन महिन्यांपासून कल्याण परिसरातील इमारतींचे रजिस्ट्रेशन वेब साईट मध्ये येत असलेल्या तांत्रिक अडचणी मुळे होऊ शकत नाही. सोसायटी रजिस्ट्रेशन साठी वेब साईट वर लॉगिन च होऊ शकत नाही आहे, त्यामुळे पुढील सर्व प्रक्रिया खोळंबुन आहे.

यासाठी अधिकारी, मंत्रालय अश्या चकरा नागरिक मारीत आहे मात्र, होईल दुरुस्त या पलीकडे कुठलेही उत्तर मिळत नाही आहे, त्यामूळे 15 फेब्रुवारी पर्यंत वेब साईट मधील बिघाड दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा कल्याणकरानी दिला आहे

Updated : 4 Feb 2019 12:53 AM IST
Next Story
Share it
Top